पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ፃ = • गीतारहस्य अथवा कर्मयेग अनुभवास येत असत्येः पण हें दुःख टाळण्यास तृष्णा किंवा असंतोष व त्याबरोबरच कमें यांचा समूळ नाश करणे योग्य नसून फक्त फलाशा सोडून सर्व कर्मे करीत रहाणें हेंच श्रेयस्कर आहे; केवळ विषयोपभोगसुख कधीहि पुरें न होणारें, अनित्य आणि पशुधर्म असून बुद्धींद्रियवान् मनुष्याचे या जगांतील खरं ध्येय यापेक्षां उच्च प्रतीचे असले पाहिजेः आत्मबुद्धिप्रसादापासून प्राप्त होणारें शांतिसुख हेंच तें खरें ध्येय होयः परंतु आध्यात्मिक सुख जरी याप्रमाणें श्रेष्ठ असले तरी या जगांत त्याला ऐहिक वस्तूंचीहि योग्य जोड लागत्ये; आणि त्यामुळे निष्काम बुद्धीनें प्रयत्न म्हणजे कर्महेि केले पाहिजे:-इतकें कर्मयोगशास्राप्रमाणे सिद्ध झाल्यावर सुखदृष्टया विचार केला तरीहि नुस्तें आधिभौतिक सुख हेंच काय तें “परम’ साध्य मानून कर्माच्या केवळ मुखदुःखात्मक बाह्य परिणामाच्या तारतम्यानेंच नीतिमतेचा निर्णय करणें योग्य नव्हे हें निराळे सांगावयास नको. कारण, जी वस्तूकेव्हाहि स्वतः परिपूर्णावस्थेसयेऊंशकत नाही ती परम साध्य मानणें म्हणजे ‘परम' शब्दाचा दुरुपयोग करून मृगजलाचे ठिकाणी जलाची भावना धरण्याइतकेंच असमंजस आहे. परम साध्यच जर अनित्य व अपुरे तर त्याची आशा धरून आपल्या पदरीं तरी अनित्याखेरीज दुसरे काय पडणार? “धमों नित्यः सुखदुःखे त्वनित्ये”या वचनांतील मर्महि हेंच आहे.“पुष्कळांचे पुष्कळ मुख” या शब्दांत सुख शब्दाचा अर्थ काय समजावूयाचा याबद्दल आधिभौतिकवाद्यांतहिं बराच मतभेद आहे. मनुष्य पुष्कळदां सर्वविषयसुखावर लाथ मारून केवळ सत्यासाठी किंवा धमासाठे जीव देण्यासहि तयार होत असल्यामुळे त्याची इच्छा नेहर्मा आधिभौतिक सुखप्राप्तीसाठीच असत्ये हें म्हणणे बरोबर नाहीं, असें या पंडितांपैकीं कित्येकांचे मत आहः आणि म्हणून सुख शब्दाऐवजीं हित किंवा कल्याण हा शब्द योजून “पुष्कळाचे पुष्कळ सुख” या सूत्राचे “पुष्कळांचे पुष्कळ हित अगर कल्याण” असें रूपान्तर करावें असें त्यांनीं प्रतिपादन केले आहे. परंतु इतकें करूनहि कत्यांच्या बुद्धीचा कांहींच विचार होत नाहीं, वगैरे दुसरे दोष या मतांत देखील कायम राहतात. बरें, विषयसुखाबरोबर मानसिक सुखाचाहेि विचार केला पाहिजे असें म्हटलें, तर कोणत्याहि कमोची नीतिमता केवळ त्याच्या बाह्य परिणामांवरूनच ठरविली पाहिजे, या पहिल्या प्रतिज्ञेस विरोध येऊन अंशत: अध्यात्मपक्ष स्वीकारल्यासारखें होतें. पण अशा रीतीनें अखेर अध्यात्मपक्ष स्वाकारणे जर टळत नाहीं तर तो अर्धवट स्वीकारण्यांत तरी काय हंशील ? म्हणून सर्वभूतहित, पुष्कळांचे पुष्कळ सुख, माणुसकीचा परम उत्कर्ष वगैरेनीतिनिर्णयाची सर्व बाह्य साधनें किंवा आधिभैौर्तिक मार्ग गौण ठरवून आत्मप्रसादरूपी अत्यन्त सुख आणि त्यालाच जोडून असणारी कत्याची शुद्धबुद्धि या आध्यात्मिक कसोटीनेंच कर्माकमीची परीक्षा केली पाहिजे, असा आमच्या