पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ ६ गीतारहस्य अथवा कर्मयोग मेाक्षाची विचार जरी सध्यां बाजूला ठेविला तरी आत्मविचारांत निमग्न झालेल्या युद्धीलाच परम सुख मिळणे शक्य असतें, असें सिद्ध होतें; व त्याचमुळे भगवद्गीतेंत सुखाचे सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन भेद केल्यावर त्यापकों “तत्सुखं सात्त्विकं प्रोक्त आत्मबुद्धिप्रसादजम् ”-आत्मनिष्ठ ( म्हणजे सर्वाभूर्ती एकच आत्मा असें आत्म्याचे खरे स्वरूप ओळखून त्यांतच रत झालेल्या) बुद्धीच्या प्रसन्नतनें जें आध्यात्मिक सुख प्राप्त होतें तेंच सात्त्विक म्हणजे श्रेष्ठ-असें प्रथम ररांगून (गी. १८.३७), नंतर इंद्रियें व इंद्रियांचे विषय यांपासून होणाच्या आधिभौतिक सुखाची पायरी याखालचा म्हणजे राजस (गी. १८.३८.), आणि चित्ताला माह पाडणाच्या वृ निद्रा किवा आलस्य यांपासून होणाच्या सुखाची येोग्यता तामस म्हणजे सर्वात कनिष्ट होय, असें पुढे क्रमवार वर्णन केले आहे. या प्रकरणाचे आरंभी गीतेंतला जो श्वटोक दिला आह त्यांतील तात्पर्य हेंच असून, या परम मुखाचा अनुभव एकदां आला म्हणजे पुढे कितीहि मेोठे दुःख असले तरी त्यानें हीं स्थिती हालत नाही, असे गीताच सांगत आहे (गी. ६. २२.). हें अत्यन्त मुख स्वर्गीच्याहि विषयसुखांत नसून तें मिळण्यास आपली बुद्धि प्रथम प्रसन्न झाली पाहिजे. ही कशी प्रसन्न ठेवावी हे न पाहतां केवळ विषयोपभोगांतच जो गढून जाती त्याचे सुख क्षणिक किंवा अनित्य असतें. कारण,जें इंद्रियसुख आज आहे तें उद्यां नाहीं इतकेंच नव्हे, तर जी गोष्ट आपल्या इंद्रियांस आज़ सुखकारक वाटत्ये तीच कांहीं कारणामुळे उद्यां दुःखकारक होत्ये. उदाहरणार्थ, उन्हाळ्यांत जें थंड पाणी गोड वाटतें तेंच थंडीच्या दिवसांत नकोसें होतें. बरें; इतकं करूनहि त्यापासून सुखेच्छेची पूर्ण तृप्ति होत्ये असेंहि नाहीं हें वर सांगितलेंच आहे. म्हणून सुख'हा शब्द व्यापकपणानें सर्व प्रकारच्या सुखांस जरी लावितांआला, तरी सुखासुखांतहि भद करावा लागतो. नेहमीच्या व्यवहारांत सुख म्हणजे इंद्रियसुख असाच मुख्यत्वें करून अर्थ होत असतो. पण इंद्रियार्तात म्हणजे इंद्रियसुखापलीकडल्या व केवळ आत्मनिष्ठ बुद्धीलाच कळणाच्या सुखापासून विषयोपभेोगरूपी सुखाचा जेव्हांभेद दाखविणें इष्ट असतें,तेव्हां विषयोपभोगाच्या आधिभौतिक सुखास नुस्तं सुख किंवा प्रेय, आणि आत्मबुद्धिप्रसादज म्हणजे आध्यात्मिक सुखास श्रेय, कल्याण, हित, आनंद किंवा शांति, असें म्हणण्याची वहिवाट आहे. गेल्या प्रकरणाच्या अखेरीस दिलेल्या कठोपनिषदांतील वाक्यांत प्रेय आणि श्रेय यांमध्यें नचिकेतानें जो भेद केला आहे तो याच धोरणावर केलेला आहे. मृत्यूनंत्याला अग्नीचे रहस्य पहिल्यानेंच सांगितलें होतें. पण हें सुख प्राप्त झाल्यावर नचिकेतानें पुढे, मला आत्मज्ञान सांगा असा जेव्हां वर मागितला, तेव्हां त्याऐवजी मृत्यूनें दुसच्या अनेक ऐहिक सुखांचा त्यास लोभ दाखविला. परतु मग अशा प्रकारच्या या अनित्य आधि