पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक § 3 A तद्वतच आत्यन्तिक सुखाच्या आशेनें केवळ आधिभौतिक सुखाच्या पाठीस लागणाच्यांस केव्हांहि अत्यन्त सुखाची प्राप्ति होणें दुर्घट होय. परंतु आधिभौतिक सुख हृाच काय तो सुखाचा एकटा प्रकार नसल्यामुळे या अडचणींतूनहि अत्यन्त व नित्य सुखप्राप्तीचा मार्ग काढितां यण्यासारखा आहे सुखाचे शारीरिक आणि मानसिक असे दोन भाग केल्यावर शरीराचे किंवा ईद्रियांचे व्यापारांपेक्षां मनासच शेवटीं अधिक महत्त्व द्यावें लागतें हें वर सांगितलेंच आहे. शारीरिक (म्हणजे आधिभौतिक) सुखापेक्षां मानसिक सुखाचा योग्यता अधिक असा जो सिद्धांत ज्ञानी पुरुष करितात तो आपल्या ज्ञानाच्या घमेंडीनें करीत नसून, त्यांतच श्रेष्ठ मनुष्यजन्माची खरी थोरवी म्हणजे साथैकत आहे, असें प्रसिद्ध ಶ್ಗ मिछ यानेंहि आपल्या उपयुक्ततावादावरील ग्रंथांत प्रांजलपणें कबूल केलें आहे.+ कुत्रीं, डुकरें, बैल वगैरेंसहि मनुष्याप्रमाणेच इंद्रियसुखाची गोडी असत्ये, अणि विषयोपभोग एवढेच काय तें या जगांन खरें सुख आहे अशी जर मनुष्याची समजूत असती तर मनुष्य पशु होण्यासहि राजी झाला असता. पण पशूचे सर्व विषयसुख नित्य मिळावयाचे असले तरीहेि ज्याअर्थी पशु होण्यास कोणी राजी होत नाही, त्या अर्थी पशूपंक्षां मनुष्यांमध्यें कांहीं तरी विशेष आहे असें उघड होते. हा विशेष कोणता हें पाहूं गेलें म्हणजे मन आणि बुद्धि यांच्याद्वारं स्वतःचे व बाह्य सृष्टीचे ज्यास ज्ञान होनें त्या आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करावा लागतो; आणि एकदां हा विचार सुरू झाला म्हणजे पशु आणि मनुष्य या दोघांना सारखेंच साध्य जें विषयोपभोगसुख त्यापेक्षां मनाच्या आणि बुद्धीच्या अत्यन्त उदात्त व्यापारांत व शुद्धावस्थेत जें सुख तेंच मनुष्याचे श्रेष्ट किंवा अत्यन्त सुख असें ओघानेंच प्राप्त होतें. हीं सुखें सर्व आत्मवश म्हणजे बाह्य वस्तूंची अपेक्षा न ठेवितां किंवा दुस याचे सुख कमी न करितां, आपल्या प्रयत्नानेंच आपल्या स्वतःस प्राप्त होण्या सारखीं असून, जसजसें वर चढत जावें तसतसें या सुखाचे स्वरूप अधिकाधिक शुद्धं व निर्भेळ ह्रोत असतॆ. ‘‘मनसि च परितुष्टं क्रोऽथैवान् को दरिद्रः’-मन प्रसन्न असलें म्हणजे दरिद्री काय आणि श्रीमंत काय, सारखेच,-असें भर्तृहरीनें उद्गार काढिले असून, प्लेटो नांवाच्या प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्यानेंहि शारीरिक (म्हणजे बाह्य किंवा आधिभौतिक)सुखापेक्षां मनाचे सुख श्रेष्ठ,आणि मनाच्या স্তুঞ্জিप्राह्य (म्हणजे परम आध्यात्मिक) सुख श्रेष्ठ असें प्रतिपादन केले आहे. म्हणून

  • “It is better to be a human being dissatisfied than a pig satisfied, better to be Socrates dissatisfied than a fool satisfied. And if the fool, or the pig, is of a different opinion, it is because they only know their own side of the question.” Utilitarianism, p. 14 (Longmans 1907) † Republic, Book IX.