पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ गीतारहस्य अथवा कर्मयोग कर्मण्येवाधिकार्स्ते म फळेषु कदाचनू मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वेकर्मणि ॥ या »ठोकांत (गी. २ ४७) भगवान् अर्जुनास प्रथम असें सांगतात का, तूं ज्या अर्थी या कर्मभूर्मांतच जन्मला आहेस त्या अर्थी “कमें करण्याचाच तुझा आधिकार आहे” हें खरं; पण हा तुझा अधिकार फक्त (कर्तव्य) कर्म करण्यापुरताच आहे हें लक्षांत ठेव. ‘एव' म्हणजे ‘फक्त' या पदानें कमीखेरीज इतर गोष्टींत-अर्थात् कर्मफलाचे ठायी-मनुष्याचा अधिकार नाही, असें सहज निष्पन्न होतें. पण ही महत्त्वाची गोष्ट केवळ अनुमानावर अवलंबून न ठेवितां दुस-या चरणांत “कर्मफलाच्या ठायीं केव्हांच तुझा आधकार नाहीं;” कारण, कर्माचे फल मिळणें अगर न मिळणें ही तुझ्या ताब्यांतली गोष्ट नसून नेहमीं परमेश्वराधीन किवा एकंदर सृष्टीतील कमावपाकावर अवलंबून आह. असें भगवंतांनी पुनः स्पष्ट शब्दांना सांगितले आह. ज्या बाबतीत आपला अधिकार नाहीं ती अमक्या प्रकारें घडून आली पाहिजे, अशी आशा करणें हें वेडपणाचे लक्षण होय. पण ही तिसरी गोष्टहि अनुमानावर न ठेवितां “म्हणून तूं कर्मफलाची हांव मनांत ठेवून कोणतेंहि काम करूं नको;” एकंदर कर्मविपाकाप्रमाणें तुझ्या कर्माचें जें फल व्हावयाचे असेल तें होईल, तुझ्या इच्छेनें तें कमी किंवा जास्त अगर लवकर किंवा उशीरां होणे शक्य नसून, अशा प्रकारच्या हांवरेपणानें फुकट तुला मात्र दुःख व त्रास होतो, असें तिसच्या चरणांत सांगितले आहे. पण कर्म करा व फलाशा सोडा, अशा प्रकारचा खटाटोप करीत बसण्यापेक्षां कर्मच अजोबात सोडणें बरें नव्हे काय? असा या ठिकाणों कोणी-विशेषतः संन्यासमागी-प्रश्न करील. यासाठी अखेर “कर्म न करण्याचा (अकर्मणि) तूं आग्रह धरूं नको,” तुझा जो अधिकार आहे त्याप्रमाणे-पण फलाशा सोडून-कर्मच करीत रहा, असें भगवंतांनीं शेवटीं निश्चित विधान केले आहे. कर्मयोगदृष्टया हे सिद्धान्त इतक्या महत्त्वाचे आहेत कीं, वरील श्लोकाचे चार चरण म्हणजे कर्मयोगशास्राची किंवा गीताधमीचा चतुःसूत्रीच होय, असें म्हणण्यास हरकत नाहीं. संसारांत सुखदुःखें नेहमींच पर्यायानें प्राप्त होत असून सुखांपेक्षां दुःखांचीच बेरीज अखेर अधिक हें सिद्ध असतांहि जर सांसारिक कर्म सोडावयाची नाहींत, तर अत्यंत दुःखनिवृति होऊन अत्यंत सुख प्राप्त करून घेण्याचे मनुष्याचे प्रयत्न व्यर्थ होत असें कित्येकांस वाटण्याचा संभव आहे; आणि केवळ आधिभौतिक-म्हणजे इंद्रियगम्य बाह्य विषयोपभोगरूपी-सुखांकडेच दृष्टि दिली तर ही त्यांची समजूत गैरवाजवी आहे असे म्हणतां यावयाचे नाहीं. चांदोबास धरण्यासाठी आकाशांत हात पसरणाच्या लहान मुलाच्या मुठींत ज्याप्रमाणे चांदोबा कर्धींच सांपडत नाहीं,