पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःखविवेक ‘l o o त्याचीहि तीच स्थिति होणार. सारांश, असंतोष हा सर्व भावी उत्कर्षाचे,प्रयत्नाचे, ऐश्वर्याचे व मोक्षाचेंहि बीज आहे; आणि हा असंतोष जर आपण सर्वाशी नष्ट केला तर या जगांत व परलोकींहि आपली धडगत लागणार नाहीं हें प्रत्येकानें नेहमी लक्षांत ठेविले पाहिजे. भगवद्गीतेंहि श्रीकृष्णाचा उपदेश ऐकत असतां “ भूयःकथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम्” (गी १०.१८ )-तुमर्चे अमृतासारखै भाषण ऐकून माझी तृप्तिच होत नाही म्हणून मला पुनःआपल्या विभूति सांगा-असे अर्जुनानें म्हटल्यावर, भगवंतानी पुन:विभूति सांगण्यास सुरुवात केली आहे; तूं आपली इच्छा अांवर, अतृप्ति किवा असंतोष योग्य नव्हे, असा उपदेश केला नाहीं. यावरून चांगल्या किवा कल्याणकारक गोष्टीबद्दल योग्य असंतोष असणें भगवंतांसहेि इष्ट आहे असें सिद्ध होतें; व “यशसि चाभिरुचिव्र्यसनं श्रुतौ”-गोडी किंवा इच्छा पाहिजे, पण ती यशाची असावी; आणि व्यसनहि पाहिजे, पण विद्येचें असावें, तें गर्ह नाही;-असा भर्तृहरीचाहि एक श्लेोक आहे. कामक्रोधादि विकारांप्रमाणें असंतेोषहि अनावर होऊंदेतां कामा नये, अनावर झाल्यास तो सर्वस्वाचा नाश करील, हें उघड आहे; आणि याच हेतुनें केवळ विषयोपभोगाप्रीत्यर्थ तृष्णेवर तृष्णा किंवा आशेवर आशा डाळून ऐहिक सुखाच्या मागें एकसारखे धांवत सुटणाच्या पुरुषाच्या संपत्तीस गीतच्या सोळाव्या अध्यायांत ‘आसुरी संपत्’ असें नांव दिलें आह. अशा हांवरेपणानें मनुष्याच्या मनांतील सात्त्विक वृत्तीचा नाश होऊन तो अधोगतीस जातो इतकेंच नव्हे, तर तृष्णेची तृप्ति होणेंहि कधा शक्य नसल्यामुळे कामोपभोगवासना अधिकाधिक वाढत जाऊन त्यांतच शेवटीं मनुष्याचा अंत होतो. पण उलटपक्षीं तृष्णेचा किंवा असंतोषाचा हा दुष्परिणाम टाळण्यास सर्व प्रकारची तृष्णा व त्याबरोबराच एकदम सर्व कमें सोडणे हाहि सात्त्विक मागै नव्हे. वर सांगितल्याप्रमाणें तृष्णा किंवा असंतोष हें भावी उत्कर्षाचे बीज आहे. म्हणून चोराच्या भीतीनें सावासहि मारण्याचा प्रयत्न न करितां कोणत्या तृष्णेपासून किंवा असंतोषापासून दुःख होतें याचा नीट विचार करून, दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडणे, हा युक्तीचा मधला मागै स्वीकारिला पाहिजे; त्याँ साठी यञ्चयावत् कर्म सोडण्याचे कारण नाही. दुःखकारक तेवढीच आशा सोडून देऊन स्वधर्माप्रमाणें कर्म करण्याची जी ही युक्ति किंवा कौशल्य त्यासच ‘योग' किंवा ‘कर्मयोग' असें म्हणतात(गी. २.५०); व तोच गीतेंतमुख्यतः प्रतिपाद्य असल्यामूळे गीतंत कोणत्या प्रकारची आशा दुःखकारक ठरविली आहे याचा येथे आणखी थोडा विचार करूं. मनुष्य कानांनीं ऐकतों, त्वचेनें स्पर्श करतो, डोळयांनीं पहातो, जिव्हेनें चाखतो, व नाकानें वास घेतो; आणि इंद्रियांचे हे व्यापार इंद्रियांच्या स्वाभाविक