पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* az गीतांरहस्य अथवा कर्मयेोग जैन व बौद्ध धर्माचा पायाहि याच तत्त्वावर आह; आणि पाश्चात्त्य देशांत शोपेनहौएर* यानें अर्वाचीन कालीं हेंच मत प्रतिपादिले आहे. पण याच्या उलट असेंहि विचारितां येईल कंा जिल्लेनें कधी कधीं अपशब्द उच्चारिले जातात म्हणून सबंध जीभच तोडून टाकावयाची काय ? किंवा अग्नीनें कधी कधी घरें जळतात म्हणून विस्तवाचा सर्वस्वां त्याग करून पाकसिाद्ध करणेंहि लोकांनी सोडून दिलें आह काय ? अग्नीसच काय पण विद्युच्छक्तीसहि योग्य मर्यादेंत ठेवून आपण त्यांचा जर नित्य व्यवहारांत उपयोग करून घेतों, तर तृष्णेची किंवा असंतोषाची त्याचप्रमाणें व्यवस्था लावणें कांही अशक्य नाही. त्यांतून असंतोष हा जर सर्वाशीं किंवा सर्व प्रसंगी गैरफायद्याचाच असता तर गोष्ट निराळी. पण विचारान्ती तसा प्रकार आढ* ळून येत नाहीं. असंतोष म्हणजे नुसती हांव अगर रडवेपणा असा अर्थ नव्हे. हा असंतोष शास्रकारांनीहि गह्य मानेिला आहे. पण आपणांस प्राप्त झालेल्या स्थिर्तींतच कुजत न रहातां तैति यथाशक्ति शान्त व सम चित्तानें उत्तरोत्तर आधिकाधिक सुधारणा करीत राहून ती शक्य तेवढ्या उत्तमावस्थेस आणण्याची जी इच्छा तिला मूलभूत होणारा जो असंतोष तो कधींच गह्य मानितां येत नाहीं. चातुर्वण्यानें बांधलेल्या समाजांत ब्राह्मणांनी ज्ञानाची, क्षत्रियांनी ऐश्वर्याची आणि वैश्यांनी धनथान्याचीं अशा प्रकारची इच्छा अगर वासना जर सोडिली तर तो समाज लवकरच अधोगतीस जाईल हें सांगावयास नको. हाच अभिप्राय मनांत आणून व्यांसांनी “यझेो विद्या समुत्थानमसंतोषः श्रियं प्रति ’ (शां. २३. ९)-यज्ञ, विद्या, उद्योग आणि ऐश्वर्याविषयी असंतोष हे क्षत्रियाचे गुण होत-असें युधिष्ठिरास सांगूितले आहे. त्याचप्रमाणें विदुलेनें आपल्या पुत्रास उपदेश करितांनीहि “र्सतोषेो वै श्रियं हन्ति” (मभा. उ. १३२.३३)-संतेोषानें ऐश्वर्यं बुडतें,-असें म्हटलें असून “ असंतोषः श्रेियो मूलं ” (मभा. सभा. ५५. ११), असें दुसच्या एका प्रसंगीहि वाक्य आलेले आहे fब्राह्मणधर्मात संतोष हा गुण म्हटला आहे; तथापि त्याचा अर्थ चातुर्वण्र्यधर्माप्रमाणें द्रव्याविषयीं किंवा ऐहिक ऐश्वर्यावद्दल संतोष एवढाच अभिप्रेत आहे. मला प्राप्त झाले आहे तेवढ्या झानानेंच माझा संतोष आह असे जर कोणी ब्राह्मण म्हणेल, तर तेो स्वतःचा नाश करून घेईल; आणि वैश्य किंवा शूद्र आपआपल्या धर्माप्रमाणें जें मिळाले आह तेवढ्यानेंच सदा संतुष्ट राहिल्यास

  • Schopennauer's World as Will and Representation, Vol. II, Chap 46. संसाराच्या दु:खमयत्वाचे शोपेमहौएरचे वर्णन फारच सरस आहे. मूळ ग्रंथ जर्मन भाषेत असून त्याचे इंग्रजीत भाषांतर झालेलें आहे.

tgf. “Unhappiness is the cause of progress.” Dr. Pau Carus' Zhe Ethical Problem, p. 251 (2nd Ed.)