पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ गीतारहस्य अथवा कर्मयोग ग्रंथांत केलेला असल्यामुळे त्यांची येथे पुनरुक्ति करीत नाहीं. तसेंच पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांचा ‘कृष्ण आणि गीता' या नांवाचा एक इंग्रजी ग्रंथहि अलीकडे प्रसिद्ध झाला असून त्यांत सदर पंडितांनीं गीतेवर दिलेलीं बारा व्याख्यानें छापिलीं आहेत. पण या अगर मि. बुक्स यांच्या व आमच्या प्रतिपादनांत पुष्कळ अंतर आहे हें सदर ग्रंथ वाचिले असतां कोणाच्याहि लक्षांत येईल. तथापि वरील लेखांवरून गीतेसंबंधानें आमचे विचार अपूर्व नसून गीतेंतील कर्मयोगाकडे लोकांचे आधिकाधिक लक्ष लागत चालल्याचे हें सुचिन्ह असल्यामुळे आम्ही या सर्व आधुनिक लेखकांचे येथे अभिनंदन करितों. हा ग्रंथ मन्दलेस लिहून झाला खरा; पण तो शिसपेन्सिलीनें लिहिलेला असून त्यांत ब-याच ठिकाणीं खोडाखोड केलेली व शोध घातलेले होते. म्हणून पुढे तो सरकारांत जाऊन परत आल्यावर त्याची छापण्यासाठी शुद्ध नक्कल करणे जरूर होतें; आणि हें काम आमच्यावर पडले असतें तर ग्रंथ प्रसिद्ध होण्यास आणखी किती महिने लागले असत कोणास ठाऊक ! पण रा. रा. वामन गोपाळ जोशी, नारायण कृष्ण गोगटे, रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रामकृष्ण सदाशिव पिँपुटकर, अप्पाजी विष्णु कुळकर्णी वगैरे गृहस्थांनी या कामीं हौसेनें मदत करून तें जलदीनें पुरें केलें याबद्दल त्यांचे आभार मानिले पाहिजेत. तसेंच रा. रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनीं, आणि विशेषेकरून वेदशास्रसंपन्न दीक्षित काशीनाथशास्री लेले यांनींहे मुद्दाम मुंबईहून येथे येऊन, ग्रंथाची लेखी प्रत वाचण्याची तसदी घेतली आणि बच्याच उपयुक्त व मार्मिक सूचना केल्या याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहं . तथापि ग्रंथांतील मतांबद्दलची जबाबदारी सर्वस्वीं आमची आहे हें विसरता कामा नये. ग्रंथ याप्रमाणें छापण्यास तयार झाला. पण लढाईमुळे कागदाची उणीव पडणार होती. ती मुंबईतील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक मेसर्स डी. पदमजी आणि सन यांनीं वेळेवर आमच्या मताप्रमाणे चांगला कागद पुरविल्यामुळे, दूर झाली, व गीतेचा ग्रंथ चांगल्या स्वदेशी कागदावर छापावयास मिळाला. तथापि ग्रंथ छापतांना ती अजमासाबाहेर वाढल्यामुळे पुनः कागदाची उणीव पडली; व ती पुण्यांतील रे पेपर मिलच्या मालकांनीं भरून काढिली नसती तर आणखी कांहीं महिने ग्रंथ प्रसिद्ध होण्याची वाचकांस वाट पहावी लागली असती. म्हणून वरील दोन्ही गिरण्यांचे मालक यांचे आम्हींच नव्हे तर वाचकांनीहि आभार मानिले पाहिजेत. शेवटी घुकें तपासण्याचे काम राहिले. हें रा. रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रा. रा. रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर आणि रा. रा. हरि रघुनाथ भागवत यांनी पत्करिलें. त्यांतहि जागोजाग आलेले इतर ग्रंथांचे उल्लेख बरोबर आहेत कीं नाहींत हें तपासण्याचे व कोठे क*ीं