पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक ۹ اما دی जमेस न धरितां मनुष्याच्या प्रस्तुतच्या सुखदुःखांचा विचार त्याच्या प्रस्तुतच्या गरजांवरूनच करीत असतात; आणि या गरजा कोणत्या हें पाहूं लागले म्हणज त्यांना कधींच अंत नाहीं ओस आढळून येतें. आज एक इच्छा सफल झाली तर उद्यां त्या जागीं नवी इच्छा उत्पन्न होऊन ही नवी इच्छा सफल करून घ्यावी असे वाटू लागतें; आणि मनुष्याच्या इच्छेची ही धांव नेहमीच एक पाऊल पुढे असल्यामुळे त्याच्या कपाळचे दुःख सुटत नाही. सर्व सुख तृष्णाक्षयरूपच आहे, आणि कितीहि सुख मिळाले तरी मनुष्य पुनः असंतुष्टच असतो, या दोन गोष्टंातला भद या ठिकाणीं नीटलक्षांत आणिला पाहिजे. प्रत्यकसुखदुःखाभावरूप नसून सुख आणि दुःख या इंद्रियांच्या दोन स्वतंत्र वेदना आहत हें म्हणण निराळे आणिं कोणत्याहि एका काळीं प्राप्त झालेली सुखें जमेस न धरितां आणखी सुखें पाहिजेत म्हणून असंतुष्ट रहाणें निराळे. पहिला वाद सुखाच्या वस्तुस्वरूपाचा आह; आणि प्राप्त झालल्या सुखानें पूर्ण तृप्ति होत्ये कीं नाहीं हा दुसरा प्रश्न आहे. विषयवासना सतत एकसारखी वाढत जात असल्यामुळे दररेज नवी नवीं सुखें न मिळालीं तरी पूर्वीचोंच सुखें पुनःपुनः भेागावी असे वाटून मनाची हांव कांहीं अांवरत नाहीं. व्हिटेलियस नांवाच्या एका रोमन बादशहाची अशी गोष्ट सांगतात कीं, जिव्हचें सुख पुनःपुनः मिळावें म्हणून पोटांत गेलेलें अन्न ओकून टाकण्याचीं औषधे घेऊन ते दररोज अनकवेळां भेोजन करी ! पण पस्तावलेल्या ययाति राजाची गोष्ट याहूनहिं अधिक बोधप्रद आहे. ययाति राजा शुक्राचार्याच्या शापानें म्हातारा झाल्यtवर तें म्हातारपण दुस-याला देऊन त्याऐवजीं त्याचे तारुण्य घेण्याची शुक्राचार्यांनी दयाळू होऊन त्याला सवलत दिली होती. तव्हां आपल्या मुलाचे म्हणजे पुरूचे तारुण्य घेऊन ययातीनें एक हजार वर्ष एकसारखा विषयसुखेोपभेाग घेतल्थावर पृथ्वींतील सर्व पदार्थ एका मनुष्याचीहि सुखवासना तृप्त करण्यास असभथे आहेत असें त्याच्या अनुभवास आलें; आणि न जातु काम कमान उपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवत्मर्वे भूय एवाभिवर्धत ॥ “सुखांचा उपभोग घेतल्यानें विषयवासनेची तृप्ति न होतां हवनद्रव्यानें जसा अग्नि त्याप्रमाणे उपभेागानं विषयवासना अधिकाधिकच वाढत्यें”-असे त्याच्या तोंडांतून उद्गार निघाले, असें महाभारताच्या आदिपर्वात व्यासांनी वर्णिलं आहे (आ. ७५.४९); आणि हाच श्लोक मनुस्मृतीतहि दिलेला आह (मनु. २.९४).सुखसाधनें कितीहिमुबलक असली तरी इंद्रियांची खवखव सतत वाढत्या प्रमाणावर असल्यामुळे केवळ सुखेापभेागानें सुखेच्छा कधीहि तृप्त होत नाहीं, तिला दुसरा कांहीं तरी आळा घालावा लागतो, हें यांतील बीज आहे; व धर्मशास्रावराल आ