पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःस्रविवेक १०३ वस्तुतः पहाता खरा नाहीं. क्वचित् प्रसंगी एखादा मनुष्य संसाराला कंटाळून जीव देती, नाही असें नाहीं; पण लोक त्याची गणना अपवादांत म्हणजे वेड्यात करितात. यावरून जीव देणें किवा न देणें याचा सं ां संबंध न ठेवतां सामान्य लोक ही एक स्वतंत्र गोष्ट समजतात असें दिसून येतें; आणि सुधारलेल्या माणसास अत्यंत कष्टमय वाटणाच्या रानटी मनुष्याच्या संसाराचा विचार केला तरीहि हेंच अनुमान निष्पन्न होतें. प्रसिद्ध सृष्टिशास्रज्ञ चालेस डार्विन हा आपल्या प्रवास-ग्रंथांत दक्षिण अमेरिकेच्या अत्यंत दक्षिणेकडील प्रांतांत त्यास आढळून आलेल्या रानटी लोकांचे वर्णन करितांना असें लिहितो कीं, हे रानटी लोक-पुरुष आणि स्रियाआपल्या अत्यंत थंड देशांत बाराहि महिने वस्राखेरीज हिंडतात, आणि जवळ अन्नाचा सांठा करीतनसल्यामुळे कित्येक दिवस त्यांस अन्नावांचूनहि कंठाव लागतात; तथापि त्यांची प्रजा वाढतच आह !* पण असली रानटी मनुष्येंहि जीव देत नाहीत, यावरून त्यांचा संसार सुखमय आहे असें कोणीच अनुमान करीत नाहीं. ते आत्महत्या करीत नाहीत हें खरें; पण त्याचे कारण काय याचा जर सूक्ष्म विचार केला तर असे दिसून येईल कीं, “ मी पशु नसून मनुष्य आहं, ” यांतच प्रत्येक इसम अत्यंत आनंद मानीत असते; आणि इतर सवै सुखांपेक्षां मनुष्य होणें या सुखाचे मान इतकं मेोठे समजतो कीं, संसार कितीहि कष्टमय असला तरी तिकडे न पाहतां मनुष्यत्वाचा हा श्रेष्ठ आनंद गमाविण्यास तो कधीहि तयार नसतो. मनुष्यच काय पण पशुपक्षीहि आत्महत्या करीत नाहीत. म्हणून त्यांचाहि संसार सुखमय झाला काय ? अर्थात् मनुष्य किंवा पशुपक्षी जीव देत नाहीत एवढ्यावरून त्यांचा संसार सुखमय आहे असें भ्रामक अनुमान न काढितां, संसार कसाहि असो, त्याची अपेक्षा न ठेवतां केवळ अचेतनाचें सूचेतन बनण्यांतच अनुपम आनंद आह, आणि त्यांतहि मनुष्यत्वाचा आनंद सर्वांत श्रेष्ठ आहे, एवढेच काय तें खरें अनुमान त्यापासून निघतं, असें आमच्या शास्रकारांनी ठरविले आह. तaनां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीविनः । ੇ नराः श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणॆाः स्मृताः ॥ ब्राह्मणेषु च विद्वांम्नः विद्वत्सु क्रुतबुद्धयः । क्रुतबुद्धिषु कतोर:कट्टेषु ब्रह्मवाकिर्नः ॥ “अचेतनापेक्षां सचेतन, सचेतनांत बुद्धि असलेले, बुद्धिमानांत मनुष्य, मनुष्यांत ब्राह्मण, ब्राह्मणांत विद्वान्, विद्वानांत कृतबुद्धि (सुसंस्कृत बुद्धीचे), कृतबुद्धींमध्यं कर्ते, आणि कत्र्यातहि ब्रह्मवादी,” अशा ज्या चढत्या पायच्या शास्रांत वर्णिल्या आहत त्या याच धेरणावर लाविलेल्या आहत (मनु. १.९६,९७; मभा.

  • Darwin's ...aturalist's Voyage round the word, Chap. x.