पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक &\s लागत असतात हें उघड आहे. म्हणून वेदान्तग्रंथांतील परिभाषेप्रमाणें सुखदुःखांचे त्रिविध वर्गीकरण न करितां त्यांचे बाह्य किंवा शारीर, आणि आभ्यतर किंवा मानासक, असे दोनच वर्ग कल्पून पहिल्या म्हणजे सर्व प्रकारच्या शारीर सुखदुःखांस ‘आधभौतिक' आणि सर्व मानासक सुखदुःखांस ‘आध्यात्मक’ हीं नांवें आह्मीं या ग्रंथांत योजिलों आहेत. वेदांन्तग्रंथांतल्या परिभाषेप्रमाणें ‘आधिदैविक' म्हणून निराळा तिसरा वर्ग केलेला नाही. कारण, आमच्या मतें सुखदुःखांचे शास्राय विवेचन करण्यास हें द्विविध वर्गीकरणच अधिक सोयीचे आहे, सुखदु:खांचे पुढील विवेचन वाचितांना वेदान्तग्रंथांतल्या आणि आमच्या परिभाषेतील हा भेद नेहमीं लक्षांत ठेविला पाहिजे. सुखदुःखें द्विविध माना किंवा त्रिावध माना, त्यांपैकीं दुःख कोणासच नको असतें; म्हणून, सर्व प्रकारच्या दु:खांची अत्यंत निवृत्ति करणे आणि आत्यंतिक व नित्य सुखाची प्राप्ति करून घेणें हाच मनुष्याचा परम पुरुषार्थ होय, असें वेदान्त व सांख्य या दोन्ही शास्रांतून म्हटलें आहे (सां. का. १; गी. ६. २१. २२). आत्यंतिक सुखहंच या प्रमाणें परम साध्य ठरल्यावर अत्यंत,सत्य व नित्य सुख कशाला म्हणावें, त्याची प्राप्ति होणे शक्य आह कीं नाहीं, शक्य असल्यास कशी व केव्हां, इत्यादि गोष्टींचा विचार साहाजेकरीत्याच प्राप्त होतेा; आणि हा विचार करावयास लागलें म्हणजे प्रथमच असा प्रश्न उद्भवतो कीं, नैय्यायिकांच्या ತ್ಗ या दोन निरनिराळया स्वतंत्र वेदना, अनुभव किंवा वस्तु आहेत, अथवा ** नाहीं तो अंधेर” या न्यायानें या दोन वेदनांपैकी एकीच्या अभावास दुसरी संज्ञा आहे ? “तान्हेनें आपल्या तोंडाला कोरड़ पडली म्हणजे तें दुःख निवारण करण्यासाठी आपण गोड पाणी पितों, भुकनें पीडिलें म्हणजे सुग्रास अन्न खाऊन ती व्यथा घालवितों, आणि कामवासना प्रदीप्त होऊन दुःसह झाली म्हणजे स्रीसगानें ती तृप्त करितों,” असें सांगून भर्तृहरि अखेरीस असे म्हणतो कीं, परीाकारे व्याधैः सुखनमिति विपथैस्यति जनः । ‘‘कोणतीहि व्याध अगर दुःख झाल्यावर त्याचे जें निवारण त्यालाच लोक भ्रमानें ‘सुख' असे म्हणत असतात !” दुःख निवारणापलीकडे ‘सुख' म्हणून कांहीं निराळा पदार्थ नाही. मनुष्य स्वार्थासाठी जे व्यवहार करितेो त्यांसच हा न्याय लागू पडतो असें नाहीं. दुस-यावर उपकार करितेवेळींहेि त्याचे दुखः पाहून आपल्या मनांतील जागृत झालेली कारुण्यवृत्ति आपणांस दुःसह होऊं लागत्ये व तिच्या दुःसहत्वाची ही व्यथा घालावण्यासाठी आपण परोपकार करतें, असें आनन्दगिरीचे मत मागील प्रकरणांत सांगितले आहे. हा पक्ष स्वीकारिला म्हणजे महाभारतांत एके ठिकाणीं- * गिी. र. ७