पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

くの。 गीतारहस्य अथवा कर्मयोग पण तवढयानें लांच दिली ही गोष्ट न्याय्य होत नाहीं. ५. दान करणे हा आपला धर्म (दातव्यं)समजून निष्काम बुद्धीनें दान करणे आणि कीर्तीसाठी किंवा दुस-या कांहीं फलासाठी दान करणें या दोन कृत्यांचे बाह्य परिणाम जरी एकसारखेच असले, तरी पहिलें दान सात्त्विक व दुसरें राजस, असा भगवद्गीतेंतहि भद केलेला आहे (गी.१७. २०, २१.): आणिनेंच दान कुपात्रीं असल्यास तामस किंवा गह्य होय असें म्हटले आह. लोकांतहि गरीबानें एखाद्या धर्मकायीस चार पैसे दिले व त्याच कृत्यास श्रीमंतानें शंभर रुपरे, दिले तर त्या दोहोंची नैतिक योग्यता एकच समजतात. पण केवळ “पुष्कळांचे पुष्कळ हित” कशांत आह या बाह्य साधनानेंच जर विचार केला तर ही दोन्ही दानं नैतिकदृष्टया सारख्याच योग्यतेची होत नाहीत असें म्हणावें लागेल. “पुष्कळांचे पुष्कळ हित” या आधभौतिक नाितनत्त्वांत जो मोठा दोष अह तो हाच की, क्त्यांच्या मनांतील हेतूचा किवा बुद्धीचा त्यांत कांहींच विचार होत नाही; आणि अंतस्थ हेतूकडे लक्ष द्यावयाचे म्हटले तर, पुष्कळांचे पुष्कळबाह्य सुख हीच काय ती एक नीतिमतेची कसोटी अशीं जा पहिलो प्रतिज्ञा तिला विरोध येतेो. कायदे करणारी सभा किवा मंडळी अनेक व्थक्तीचा समुदाय असल्यामुळे त्यांनी केलेला कायदा अगर नियम योग्य आहे की नाही याचा विचार करितांना त्यांचे अत:करण कसे होतें हें पहावयाचे कारण रहात नाही; त्यांच्या कायद्यापासून पुष्कळांना पुष्कळ सुख होईल की नाही, एवढाच बाह्य विचार केला म्हणजे पुरे होतें. पण इतर ठिकाणी तो न्याय लागू पडत नाही, हें वरील उदाहरणावरून केोणाच्याहि सहज लक्षांत येईल. “पुष्कळांचे पुष्कळ हित किवा सुख” हें तत्त्व अगदींच निरुपयोगी आहे असें आमचे म्हणणे नाही. केवळ बाह्य गोष्टींचा विचार कर्तव्य असतां यापेक्षां दुसरें उत्कृष्ट तत्त्व मिळावयाचे नाही. पण एखादी गोष्ट नीतिदृष्टया न्याथ्य अगर अन्याथ्य याचा निर्णय करितांना था बाह्य तत्त्वाखेरीज पुष्कळ प्रसंगी दुसन्या अनेक गोष्टीचाहि विचार अवश्य करावा लागत असल्यामुळे नीतिमतेचा निर्णय करण्यास केवळ याच तत्त्वावर सर्वस्वा अवलेबून रहातां येत नाहीं; यापेक्षां अधिक निश्चित घ निर्दोष तत्त्व शोधून काढणे जरूर आहे, एवढेच काय तें आमचे सांगणें आह. ‘कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ” (गी. २ ४९) असें जें गीतेंत आरंभीच म्हटलें आह त्यांतील अभिप्रायहि असाच आहे. केवळ बाह्य कर्मच पाहिले तर ते पुष्कळदां भ्रामक असतें ‘स्नानसेध्या टिळेमाळा’हें बाह्य कर्म कायम राहून ‘पोटी क्रोधाचांउमाळा' असणें कांही 3.शक्य नाही. पण उलटपक्षी म्हणजे पोटांतील बुद्धि शुद्ध असेल तर बाह्य कर्माचे कांही महत्त्व न रहातां, सुदाम्याच्या

  • हें उदाहरण डा. पाँल कॅरस aisai Zhe othical A roblem(pp. 58, 30, 2nd Ed. ) या पुस्तकांतून घेतलें आहे.