पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद ۹ وا अगाऊच ज्या आपमतलबी निव्वळ स्वार्थपरायण आधिभौतिक सुखवादपंथाचा अशा प्रकारं निषध केला त्या आसुरी मताचा नुस्ता उल्लेख करणे म्हणजेच त्याचे खडन करणें होय. लोकांचें कांहीं होवेो, केवळ आपल्या स्वतःचे विषयोपभोगसुख हृाव परमपुरुषार्थ मानून नीतिमतेला व धर्माला झुगारून देणारी आधिभौतिकवाद्यांची अत्यंत कनिष्ट पायरी कर्मयोगशास्रावरील सर्व ग्रंथकारांनीं व सामान्य लोकांनीहि आतां अत्यंत अनीतिची, त्याज्य व गर्य ठरावली आहे. किंबहुना हा पंथ नीतिशास्र किंवा नीतिविवेचन या नांवालाहि पात्र नाहीं. म्हणून याबद्दल जास्त विचार करीत न बसतां आधिभैौतिकसुखवाद्यांचा दुसच्या वर्गाकडे वळू. ढळढळीत नागडा स्वार्थ अगर आप्पलपोटेपणा जगांत चालत नाहीं, कारण, आधिभौतिक विषयसुख जरी प्रत्येकास इष्ट असले तरी आपलें सुख इतर लोकांच्या सुखोपभोगांत आड आल्यास ते आपल्यास विघ्र केल्याखेरीज रहात नाहीत, असे प्रत्यक्ष अनुभवास येतें. म्हणून दुसर कित्येक आधिभौतक पंडित असें प्रतिपादन करितात कीं, स्वतःचे सुख किंवा स्वार्थ जरी साध्य असला तरी लेोकांना आपल्या प्रमाणेच सवलत दिल्याखेरीज आपल्याला सुख मिळणें शक्य नसल्यामुळे स्वसुखासाठीच दूरदशींपणानें इतर लोकांच्या सुखाकडेहि आपणांस पाहिले पाहिजे. या ांची आम्हा दुसच्या वर्गात गणना करितों. नीतीच्या आधिभौतिक उपपत्तीस खरी सुरवात येथपासूनच होत्ये म्हटले तरी चालेल. कारण, समाजसुधारणेस नीतीचीं बंधनें नकोत असें चावीकाप्रमाणें न म्हणतां, उलट ती सर्वानांच कां पाळिली पाहिजेत याचे आपल्या दृष्टीनें कारणसांगण्याचा या वर्गातील लोकांनूी प्रयत्न केला आहे. यांचे असे म्हणणे आहे कीं,जगांत अहिंसाधर्म कसा निघाला किंवा लोक तो कांपाळितात याचा सूक्ष्म विचार केल्यास “मीं लोकांस मारिलें तर लोक मला मारतील व मग माझं सुख मला अंतरेल,” या स्वार्थमूलक भीतीखेरीज त्याच्या बुडाशीं दुसरें कांहींहि कारण नाही असें दिसून येईल; आणि अहिंसाधमीप्रमाणेच इतर सर्व धर्महि याच स्वार्थमूलक कारणामुळे प्रचारांत आलेले आहेत. स्वतःला दुःख झाले म्हणजे आपण रडतों व दुस-याला झालें तर दया येत्ये. कां ? तर आपलीहि पुढे कदाचित् तशी अवस्था होईल ही भीति,-अर्थात् स्वतःचे भावी दुःख-मनांत येतें म्हणून. परोपकार, जैादायै, दया, माया, कृतज्ञता, नम्रता, मैत्री वगैरे जे गुण सकृद्दर्शनी लोकांच्या सुखासाठी आहेत असें वाटतें ते मूळांत पाहूंगेले असतां स्वतःच्याच सुखाचे किंवा स्वतःच्याच दुःखनिवारणाचे पर्याये आहेत. आपल्यावर प्रसंग आल्यास लोकांनी आपल्यास मदत करावी याच अंतस्थ बुद्धीनें केोणी झाला तरी दुस-यास मदत करितो किंवा दान देतो; आणि आपल्यावर लेोकांनी माया