पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VH & गीतारहस्य अथवा कर्मयेोग करावा,”-ऋणं कृत्वा घृतं पिबेत्,-मेल्यावर कांहीं नाहीं. असें या चार्वाक बहाद्दराचे मत आहे. चार्वकं हिंदुस्थानांत जन्मले होते म्हणून त्यांनी घृतावरच तहान भागवून घेतली. नाहीपेक्षां “ ऋणं कृत्वा सुरां पिबेत्” असें या सूत्राचे रूपांतर झाले असतें ! कोठला धर्म आणि कसला परोपकार ! या जगांत ज्या वस्तु परमेश्वरानें,-शिव शिव! चुकलों! परमेश्वर कोठून आला?-या जगांत ज्या वस्तु मी पहातों त्या सर्व माझ्या उपभोगासांठीं आहेत.त्यांचा दुसरा कांहीं उपयोग दिसत नाहीं,-अर्थात् नाहींच ! मी मेले म्हणजे जग बुडालें ! म्हणून मी जिवंत आहें तोपर्यंत आज हें तर उद्यां तें, याप्रमाणे सर्व कांहीं माझ्या स्वाधीन करून घेऊन माझ्या सर्व कामवासना मी तृप्त करीन. मीं तप केलें किंवा मी कोणाला कांहीं दान दिलें तर तें सर्व माझी महती वाढावी म्हणून करणार; आणि मीं राजसूय किंवा अश्वमध यज्ञ केला तरीहेि तो केवळ माझी सत्ता सर्वत्र अबाधित आहे याचे प्रदर्शन करण्यासाठीं करीन. सारांश, या जगाचा ‘मी’ हा एकच कंद्र असून ‘मी'हेंच काय तं सर्व नीतिशास्राचें रहस्य होय; बाकी सर्व झूट आहे. “ईश्वरोऽहमहं भेोगी सिद्धेाऽहं बलवान् सुखी ” (गीता, १६.१४)-ईश्वर मं, मीच उपभोग घेणारा, आणि मीच काय तो सिद्ध, बलाढय व सुखी-इत्यादि प्रकारें आसुरी संपत्तीचें गीतेच्या सोळाव्या अध्यायांत जें वर्णन आहे, तें अशा मतांच्या मनुष्यांचेच होय. श्रीकृष्णाच्या ऐवजी यांच्यापैकीं जाबालीसारखा एखादा पुरुष अर्जुनाचे बाजूनें त्यास उपदेश करण्यास असता तर त्यानें अर्जुनाच्या आधीं एक मुस्कडांत देऊन सांगितलेंअसतें की,“ओरे! तूं मूर्ख तर नाहस ? लढाईत सर्वाना जिंकून अनेक तन्हेचे राजभोग व विलास उपभोगण्याची ही सोन्यासारखा आयती संधि तुला मिळाली असतां, “हें करूं का तें करूं?’ अशा व्यर्थ भ्रमांत तूंकांहींतरी बरळत आहेस. अशी वेळपुनः यावयाची नाहीं. कोठला आत्मा आणि कसले सोयरधायरे घेऊन बसला आहेस ? ठोक! आणि हस्तिनापुरच्या साम्राज्याचा सुखानें निष्कंटक उपभोग घे ! यांतच काय तें तुझें परम कल्याण आहे. स्वतःच्या दृश्य ऐहिक सुखाखेरीज या जगांत दुसँरं आहे काय?” परंतु या किळसवाण्या स्वार्थसाधु आणि निव्वळ आप्पलपोटेपणाच्या राक्षसी उपदेशाची अर्जुनानें वाट न बघतां आधींच श्रीकृष्णास सांगून टाकिले कीं- . झयतो-ऽपि एतान्नु हूंतुमिच्छामि झातोऽपि मधुसूदन् । अंपि त्रैलोक्यराजस्य हेतोः ཨོཾ་ནྡྲ་བྷོ་ངྷི་རྒྱུ་ཨེ་ 輯 “पृथ्वीचेच काय, पण त्रैलोक्याचे राज्य, (अशी विषयसुर्खे) जरी (या युद्धानें)मला स्वतःला मिळावयाची असली तरी त्यासाठीदेखील कौरवांना मी मारूं इच्छीत नाही. त्यांनी माझा गळा कापला तरी चालेल!” (गी. १.३५). अर्जुनानें