पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना ११ गीता सर्वमान्य झाली असती. परंतु एवढयावरच न थांबतां मोक्ष, भक्ति आणि नीतिधर्म यांमध्यें आधिभौतिक ग्रंथकारांस भासणारा विरोध, किंवा ज्ञान आणि कर्म यांमध्यं संन्यासमागयिांचे मतें असणारा विरोधहि खरा नसून ब्रह्मविद्येचे व भक्तीचे जें मूलतत्त्व तेंच नीतीचा व सत्कर्मचाहि पाया आहे असें दाखवून, ज्ञान, संन्यास, कर्म व भक्ति यांच्या योग्य मिलाफानें इहलोको आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्यानें पत्करावा याचाहेि गीतेंत निर्णय केला आहे. गीताग्रंथ याप्रमाणें प्राधान्येंकरून कर्मयोगाचा आहे म्हणूनच “ब्रह्मविद्यान्तर्गत (कर्म-) योगशास्र ” या नांवानें सर्व वैदिक ग्रंथांत त्याला अग्रस्थान प्राप्त झाले आहे. “ गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्रविस्तरैः”-एकल्या गीतेचे पुरं अध्ययन केलें म्हणजे बस्स आहे; बाकीच्या शास्रांचा फोलकट पसारा काय करावयाचा :असे म्हणतात तें कांही खोटें नाहीं; आणि म्हणूनच हिंदुधर्म व नीतिशास्र यांच्या मूलतत्त्वांची ज्यांस ओळख करून घ्यावयाची असेल त्यांनी या अपूर्व ग्रंथाचे प्रथम अध्ययन करावें असें आमचे त्यांस सविनय पण आग्रहपूर्वक सांगणे आहे. कारण सांख्य, न्याय, मीमांसा, उपनिषदें, वेदान्त वगैरे क्षराक्षरसृष्टीचा व क्षेत्रक्षेत्रज्ञज्ञानाचा विचार करणारी प्राचीन शास्ने तत्काली शक्य तेवढया पूर्णावस्थेस आल्यावर वैदिक धर्मास ज्ञानमूलकू भक्तिप्रधान व कर्मयोगपर असें जें अखेर स्वरूप आलें, व हल्लीं प्रचलित असलेल्या वैदिक धर्माचें जें मूल आहे, तेंच गीतेंत प्रतिपादिलेले असल्यामुळे, संक्षेपानें पण नि:संदिग्ध रीतीनें सांप्रतच्या हिदुधर्माची तत्त्वें समजावून देणारा गीतेसारखा दुसरा ग्रंथच संस्कृत वाङ्मयांत नाही म्हटलें तरी चालेल. गीतारहस्यांतील विवेचनाचा सामान्य रोख यावरून वाचकाच्या लक्षांत येईल. गीतेवर पहिल्या टीका कर्मयोगपर असाव्या असें गीतेवरील शांकरभाष्याच्या तिसरे अध्यायाचे अारंभीं या टीकाकारांच्या अभिप्रायांचा जो उल्लेख आहे त्यावरून दिसून येत. या टीका आतां उपलब्ध नाहीत; म्हणून गीतेचे कर्मयोगपर व तुलनात्मक हें पहिलेंच विवेचन आहे असे म्हणण्यास हरकत नाही. यांत कांहं श्लोकांचे अर्थ हल्लींच्या टीकांतून दिलेल्या अर्थीहून भिन्न असून, मराठींत पूर्वी कोठेच सविस्तर वर्णिले नाहीत असे दुसरे पुष्कळ विषयहि सागावे लागले आहेत. हे विषय व त्यांची उपपात संक्षेपानेंच पण होईल तितक्या स्पष्ट व सुबोध रीतीनें सांगण्याचा आम्हीं प्रयत्न केला आह; आणि द्विरुक्ति झाली तरीहि त्याची पर्वा न ठेवितां ज्या शब्दांचे अर्थ मराठींत अद्याप रूढ झालेले नाहींत त्यांचे पर्यायशब्द त्याना जोडूनच पुष्कळ ठिकाणीं मुद्दाम दिलेले असून, शिवाय या विषयांतील प्रमुख प्रमुख सिद्धान्त जागोजाग सारांशरूपानें उपपादनापासून निराळे काढून दाख