पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद \9 Vo सागणे शक्य नाही. निरनिराळ्यायंथकारांच्या मतांचा नुस्ता गेोषवारा देण्यासहि स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल. म्हणून भगवद्गीतेतील कर्मयोगशास्राचे स्वरूप व महत्त्व पूर्णपणें लक्षांत येण्यास नीतिशास्राच्या या आधिभौतिक पंथाची जितकी माहिती असणें अत्यंत जरूर आहे तेवढीच ढोबळ माहिती या प्रकरणांत संक्षेपानें एकत्र करून आम्ही दिली आहे. यापेक्षां जास्त माहिती कोणास पाहिजे असल्यास त्यानें पाश्चिमात्य विद्वानांचे मूळ ग्रंथच पाहिले पाहिजेत. परलोकाबद्दल किंवा आत्मविद्येबद्दल आधिभौतिकवादी उदासीन असतात असें जें वर म्हटलें आहे तेवढ्यावरून या पंथांतील सर्वच विद्वान् स्वार्थसाधु, आप्पलपोट्ये किंवा अनीतिमान्। असतात असें कोणी समजूं नये. पारलौकिक नाही तर ऐहिक दृष्टिच होईल तितकी व्यापक करून सर्व जगाच्या कल्याणासाठी झटणें हें प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य होय, असें मोठ्या कळकळीनें आणि उत्साहानें प्रतिपादन करणारे कोर्ट, मिलु, स्पन्सर वगैरे सात्त्विक वृत्तीचे पंडित या पंथांत आहत; आणि त्यांचे ग्रंथ अनेक प्रकारच्या उदात्त आणि प्रगल्भ विचारांनी भरलेले असल्यामुळे ते सर्वानींच वाचण्यासारखे आहेत. कर्मयोगशास्राचे पंथ जरी निरनिराळे असले तरी ‘जगौचे कल्याण' हें बाह्य साध्य जॉपर्यंतसुटलेंनाही तोपर्यंत नीतिशास्राच्या उपपादनाचा एखाद्याचा मार्ग भिन्न असला म्हणून तेवढ्यासाठी त्याचा उपहास करणे योग्य नाही. असो; नैतिक कर्माकमीच्या निर्णयार्थ ज्या आधिभौतिक बाह्य सुखाचा विचार करावयाचा तें कोणाचे,-स्वतःचे का परक्याचें, एकाचे का पुष्कळांचे-याबद्दल मतभेद पडून नव्याजुन्या मिळून सर्व आधिभौतिकवाद्यांचे मुख्यतः कोणत वर्ग होऊं शकतात, आणि हे त्यांचे पंथ कितपत समर्पक किंवा निर्दोष आहेत, याचा आतां संक्षेपानें क्रमशः विन्वार कर्स्. पैकीं पहिला वर्ग निव्वळ स्वार्थसुखवाद्यांचा होय. परलोक किंवा परोपकार सर्व झट असून अध्यात्मिक धर्मशाखें लुच्च्या लोकांनी आपलें पोट भरण्यासाठी लिहिलेली आहेत, या जगांत खरा काय तो स्वार्थ, आणि तो ज्या कृत्यानें साधेल किंवा ज्यानें आपल्या स्वतःच्या आधिभौतिक सुखाची अभिवृद्धि होईलतेंच न्याय्य, प्रशस्त किंवा श्रेयस्कर समजले पाहिजे, असें या पंथाचे म्हणणें आहे. आमच्या हिंदुस्थानांत हें मत फार प्राचीन काळीं चार्वाकानें कंठरवानें प्रतिपादन केले असून, रामायणांत जाबालीनें अयोध्याकांडाचे अखेर रामास केलेला कुटिल उपदश किंवा महाभारतातील कणिकनीति(मभा.आ.१४२)याच मार्गातली आहे. पंचमहाभूतें एकत्र झालीं म्हणजे त्यांच्या मिश्रणापासून आत्मा हा गुण निपजतो आणि देइ जाळला म्हणजे त्याबरोबर तोहि जळतो. म्हणून आत्मविचाराच्या भानगडीत ज पडतां शहाण्या पुरुषानें हा देह जिवंत आहे तोपर्यंत “ऋण काढूनहि सब