पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग ؟ وہ अवश्य असल्यामुळे, परलोकाबद्दल ज्यांना अनास्था आह किंवा अव्यक्त अध्यात्मज्ञानावर (व पुढे अर्थातच परमेश्वरावरहि) ज्यांचा विश्वास बसत नाही, अशा पंडितांना देखील कर्मयेोगशास्र अत्यंत महत्त्वाचे वाटून केवळ आधिभौतिकशास्ररीत्या येईल का नाहीं याबद्दल पाश्चिमात्य देशांतून पुष्कळ भवति-न-भवति झालेली आहे, ब अद्यापिहि सुरू आहे. या भवर्ति-न-भवतींत अर्वाचीन पाश्चिमात्य पंडितांनी असें ठरविलें आह कौं, नीतिशास्त्राचे विवेचन करण्यास अध्यात्मशास्राची बिलकुल अवश्यकता नाहीं. कोणतेंहिं कर्म बरें आह का वाईट आहे याचा निकाल सदर कर्माचे जे बाह्य परिणाम आपल्या प्रत्यक्ष नजरेस पडतात तेवढ्यांवरूनच केला पाहिजे, व करितांहियेतो. कारण, मनुष्यजें जें कर्म करितो तें सर्व सुखासाठी किंवा दुःखनिवारणार्थ करीत असते. किबहुना “सर्व मनुष्यांचे सुख”हेंच ऐहिक परमसाध्य आहे; आणि सवै कर्माचे शेवटचे दृश्य फल जरं याप्रमाणे निश्चित आहे तर सुखप्राप्तीचे किंवा दुःखनिवारणाचे तारतम्य म्हणजे लाघवगौरव पाहून सर्व कर्माची नीतिमत्ता ठराविणें हाच नीतिनिर्णयाचा खरा मागे होय. जी गाय अांखुडशिगी व गरीब असून पुष्कळ दूध देत्ये ती चांगली, असा बाह्योपयोगावरूनच जर व्यवहारांत कोणत्याहि पदार्थाचा चांगलेवाईटपणा ठरवितात, तर त्याच न्यायानें ज्या कर्मापासून सुखप्राप्ति किंवा दुःखनिवारणात्मक बाह्य फल अधिक तेंच नीतिदृष्टयाहिं श्रेयस्कर समजले पाहिजे.केवळ बाह्य व दृश्य परिणामांचे लाघवगैौरव पाहून नीतिमतेचा निर्णय करण्याची ही सेोपी व शास्रीय कसेोटी उपलब्ध असतां त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरण्याचा द्राविडी प्राणायाम करणे योग्य नाहीं. “अकें चेन्मधु विन्देत किमर्थ पर्वतं व्रजेत्”*-जवळ बसल्या जागींच जर मध मिळेल तर मधाची पोळी हुडकण्यास डोंगरांत जावयाचे कशाला ? कोणत्याहि कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाच्या या पक्षास आम्हीं “आधिभौतिक सुखवाद”हें नांव दिले आह. कारण, नीतिमतेच्या निर्णयाथै या मताप्रमाणे ज्या सुखदु:खांचा विचार करावयाचा ती सर्व प्रत्यक्ष दिसणारीं, बाह्य,-म्हणजे बाह्य पदार्थाचा इंद्रियांशीं संयेोग झाल्यानें उत्पन्न होणारीं, अर्थात् आधिभौतिकअसून हा पंथहि सर्व जगाचा केवळ आधिभौतिकदृष्टधा विचार करणाच्या पंडितांनीच उपस्थित केलेला आहे. परंतु या वादाची सविस्तर हकीकत या ग्रंथांत

  • या श्लोकांत ‘अर्क' या शब्दाचा अर्थ रुईचे झाड असा कित्येक करीत असतात, पण ब्रह्मसूत्र ३.४,३. वरील शांकरभाष्याच्या टीपेंत आनंदगिरीनें अर्क शब्दाचा अर्थ ‘समीप' रेत् दिला आहे. या श्लोकाचा दुसरा चरण “सिद्धस्यार्थस्य संप्राप्तौ को विद्वान्यत्नमाच