पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VᏭ YᏑ गीतारहस्य अथवा कर्मयोग हीच संशयाचे वेळीं धर्मनिर्णयाची खरी कसोटी आहे असेंहि म्हणतां येत नाहीं कारण, ज्याची जशी बुद्धि असेल त्याप्रमाणे निरनिराळे पंडित सारासार विचाराह भिन्नभिन्न तन्हेनें करून एकाच गोष्टीच्या नतिमतेचा निर्णय निरनिराळ्या प्रकारें करत असतात, असे व्यवहारांत पुष्कळदां आपल्या नजरेस पडतें; आणि हाच अर्थ * तर्कोऽप्रतिष्ठः’ या वर दिलेल्या वचनांत वर्णिला आहे. म्हणून धर्माधर्मसंशयाच्या या प्रश्नांचा बिनचूक निकाल करण्यास दुसरी कांहीं साधनें आहेत कीं नाहींत असल्यास कोणती, आणि अनेक साधनें असल्यास त्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन कोणतें, हें आतां आपणांस पाहिले पाहिजे. शास्रानें जें कांहीं ठरावावयाचें तें हेंच होय. ** अनेकसंशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम्”-अनेक शंका निघाल्यामुळे बुद्धीस प्रथम न कळणाच्या विषयांची गुंतागुत काढून टाकून त्यांतील अर्थ निःशंक व सुगम करणें, आणि डोळ्यापुढे नसणाच्या किंवा पुढे होणाच्या गोष्टींचेंहि यथार्थ ज्ञान करून देणें,-असें शास्राचे लक्षण आहे; आणि ज्योतिषशास्र शिकल्यानें पुढे होणारीं प्रहणेहि कशी वर्तवितां येतात हें पाहिलें म्हणज या लक्षणांताल * परोक्षार्थस्य दर्शकम्” या दुसच्या भागाची सार्थकता दिसून येत्य. पण अनेक संशय फिटण्यास ते संशय कोणते हें आधी कळले पाहिजे. म्हणून कोणत्याहि शास्रांतील सिद्धान्तपक्ष सांगण्यापूर्वी त्या बाबतीत जे इतर पक्ष निघालेले असतील त्यांचा अनुवाद करून त्यांतील दोष अगर अपुरेपणा दाखविण्याची प्राचीन व अवाँचीन ग्रंथकारांची पद्धत आहे. हीच पद्धत स्वीकारून गीतेंत कर्माकर्मनिर्णयार्थ प्रतिपादिलेला सिद्धान्तपक्षीय योग म्हणजे युक्ति सांगण्यापूर्वी, याच कामासाठी दुसच्या ज्या कांहीं प्रमुख युक्त्या पंडित लोक योजित असतात त्यांचाहि आतां आम्ही विचार करणार आहों. या युक्त्या आमच्याकेड पूर्वी विशेष प्रचारांत नसून प्राधान्येंकरून पाश्चिमात्य पंडितांनींच त्या अर्वाचीन काळीं पुढे आणिलेल्या आहेत हें खरें;पण तेवढयामुळे त्यांचा विचार या ग्रंथांत करू नये असें मात्र म्हणतांयेत नाही. कारण, केवळ तुलनेसाठींच नव्हे, तर गीतेंतील आध्यात्मिक कर्मयोगाचे महत्त्व लक्षांत भरण्यासहि या युक्त्यांची, संक्षेपानें कां होईना, पण माहिती असणें जरूर आहे.