पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र ७३ निवृति होईल.” नंतर प्रतर्दनास इंद्रानें आत्मविद्येचा उपदेश केला आहे. सारांश, “महाजनो येन गतः स पन्थाः” ही युक्ति सामान्य जनांसाठीं जरी सेोपी असली तरी त्यानें सर्व निर्वाह न लागतां अखेरीस महाजनांच्या वर्तनाचे खरें तत्त्व कितीहि गृढ असलें तरी आत्मज्ञानांत शिरून विचारी पुरुषांस तेंच शेोधून काढणे भाग पडतें. “ न देवचरितं चरेत् ’ देवांच्या केवळ बाह्य चरित्राप्रमाणेच वर्तन करूं नये-असा जो उपदेश करितात त्याचे कारणहि हेंच हेोय. कमीकर्मनिर्णयार्थ याखेरीज दुसरीहि एक सेोपी युक्ति कित्येकांनी काढिली आहे. त्यांचे असें म्हणणें आह कीं, कोणताहि सद्गुण झाला तरी त्याचा अतिरेक न होऊं देण्यास आपण नेहमीं जपले पाहिजे; कारणे, अशा अतिरेकानें सद्गुणाचाच अखेर दुर्गुण बनतो. दान करणें हा सद्गुण खरा, पण“अतिदानाद्वलिर्वद्धः”-तो अतिझाल्यामुळे बळी फसला गेला. प्रसिद्ध ग्रीक पंडित आरिस्टॉटल यानें आपल्या नीतिशास्रावरील ग्रंथांत कर्माकर्मनिर्णयाची हीच युक्ती सांगून प्रत्येक सद्गुण ‘आत'झाल्यानंत्याची ‘माती'कशी होत्ये हें स्पष्ट करून दाखविलें आहे. कालिदासानेंहि केवल शौर्य म्हणजे वाघासारख्या श्वापदाचे कूर काम, आणि केवलनीतिम्हणजे भित्रेपणा होय असें ठरवून, अतिथिराजा तरवार आणि राजनीति या दोहोंच्या येाग्य मिश्रणानें आपले राज्य चालवीत होता असें रघुवंशांत वर्णन केले आह (रघु. १७.४७). फार बोलेल तर वाचाळ आणि कमी बोलला तर घुम्या, पुष्कळ खर्च केला तर उधळ्या आणि न केला तर कंजुष, पुढे गेला तर हूड आणि मागे पडला तर ढिला, अतिशय आग्रह धरील तर हट्टी आणि न धरील तर चंचल, नेहमी गोंडा घोळील तर हलकट आणि ताठा धरील तर गर्विष्ठ, अशा रीतीनें भर्तहरी-आदिकांनीहि कांहीं गुणदोषांचे वर्णन केलें आहे. पण असल्या ढोबळ कसोटीनें शेवटपर्यंत निभाव लागत नाहीं. कारण, ‘अति’ म्हणजे काय किंवा ‘नेमस्त' कशाला म्हणावें हंतरी कोणीं व कसें ठरवावयाचे ? एकास किंवा एका प्रसंगीं जें ‘अति'तेंच दुसन्यास किंवा दुसच्या प्रसंगीं कमती होईल. उपजल्याबरोबर सूर्यौला धरण्यासाठी उडी मारणें मारुतीस कांहींच अवघड वाटलें नाहीं (वा. रामा.७.३५).यासाठीं श्येनानें शिबिराजास सांगितल्याप्रमाणे धर्माधर्मसंशय पडला असतां प्रत्येक मनुष्यास अखेर अविरोधात्तु यो धमैः स धर्मः सत्यविक्रम । विरोधिषु महीपाल निश्चित्य गुरुलाघ्बम् । न बाधा विद्यते यत्र तं धर्मे समुपाचरेत् । परस्परविरुद्ध धर्माचे तारतम्य किंवा लाघवगौरव पाहुनच प्रत्येक प्रसंगीं आपल्या बुद्धानं खच्या धर्माचा किंवा कर्मचा निर्णय करावा लागतो (मभा. वन. १३१.११. १२ व मनु. ९.२९९ पहा). पण तेवढ्यावरून धर्माधर्माचा सारासार विचार करणे