पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ गीातारहस्य अथवा कमंयोग लोकांच्या मनूत धर्माधर्माच्या शंकाहि कधी उत्पन्न होत नाहीत त्यांनी घालून दिलेल्या मार्गोंनें जाणें म्हणजे कठोपनिषदांत वर्णिल्याप्रमाणे (“अंधेनैव नीयमाना यथान्धाः”) आंधळ्या कोर्शिबिरीचा प्रकार होणार ! महाजन म्हणजे “मोठमोठे शिष्ट पुरुष” घेतले-आणि हाच अर्थ वरील श्लोकांत अभिप्रेत आहे-तर त्यांच्या वर्तनांत तरी मेळ कोठे आहे ? निष्पाप रामचंद्रांनीं अग्नींतून शुद्ध होऊन निघालेल्या आपल्या पत्नीचा केवळ लोकापवादासाठी त्याग केला; आणि सुग्रीव आपणास मिळावा म्हणून त्याच्याशीं ‘तुल्यारीमत्र' म्हणजे तुझे माझे शत्रुमित्र एक अशा प्रकारचा तहनामा करून रामचंद्राचा कांही एक अपराध न करणाच्या वालाचा वध केला ! परशुरामानें तर बापाच्या आज्ञेवरून प्रत्यक्ष आईचा गळा कापला ! पांडवांचे वर्तन पहावें तर पाचांची बायको एक ! स्वर्गातील देवांकडे बघावें तर कोणी अहल्येचे जार, तर केोणी (ब्रह्मदेव) मृगरूपानें आपल्याच कन्येचा अभिलाष केल्यामुळे रुद्राच्या बाणानें विद्धशरीर होऊन आकाशांत पडलेले आहत (ऐ.ब्रा.३. ३३). याच गोष्टी मनांत येऊन उत्तररामचरित्र नाटकांत लवाचे तोंडून ‘वृद्धास्ते न विचारणीयचरिताः”-या वृद्धांच्या कृत्यांचा फारसा विचार करूं नये-असे भवभूतीनें उद्गार काढिले आहेत. इंग्रजात सैतानाचा इतिहास लिहिणाच्या एका ग्रंथकारानें असें म्हटले आहे कीं, सैतानाचे साथीदार आणि देवदूत यांच्यामधील तंट्यांची हकीकत पाहिली तर पुष्कळदां देवांनीच दैत्यांस कपटानें फसावले आहे असें आढळून येतें; आणि त्याचप्रमाणें कौषीतकोब्राह्मणोपनिषदांत (कौषी.३.१ व ऐ. ब्रा. ७. २८ पहा) ईद्र प्रतर्दनास असे सांगतो की, “मीं वृत्रास (तो ब्राह्मण असतांहि) ठार केला. अरुन्मुख संन्याश्यांचे (तुकडेतुकडे करून) सालावृकांस म्हणजे लांडग्यांस (खावयास)दिले, आणि आपले अनेक करारनामे मोडून प्रल्हादाचे आप्त व गोत्रज याचा आणि पौलोम व कालखंज नामक दैत्यांचा वध केला तरी (त्यामुळे) माझा एक कंस देखील वांकडा झाला नाहीं,-“तस्य मे तत्र न लोम च मा मीयत!” “तुम्हांला या थेोर पुरुषांच्या वाईट कमोकडे लक्ष देण्याचे कारण नाहीं; तैत्तिरीयेोपनिषदांत सांगितल्याप्रमाणें (तैति. १.११.२) त्यांचीं जीं कमें चांगलीं असतील तेवढ्यांचेच अनुकरण करा, बाकीचीं सेोडून द्या; उदाहरणार्थ, परशुरामाप्रमाणेंच बापाची आज्ञा पाळा, पण आईला मारूं नका.” असें कोणी म्हणल तर चांगलेंवाईट कर्म समजण्याचे साधन काय असा जो पहिला प्रश्न तोच पुनः उत्पन्न होतो. म्हणून वरच्याप्रमाणे आपल्या कृत्यांचे वर्णन केल्यावर इंद्र प्रतर्दनास पुढे असें सांगतों कीं, “जो पूर्ण आत्मज्ञानी झाला त्याला मातृवध, पितृवध, भ्रूणहत्या किंवा स्तेय इत्यादि कोणत्याच कर्माचा दोष लागत नाहीं, हें लक्षांत अंाणून ‘आत्मा म्हणजे काय” हें तूं प्रथम समजून घे; म्हणजे तुझ्या सर्व संशयांची