पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग

गीतेंतील विवेचनाचें पूर्ण मर्म सहसा लक्षांत भरत नाहीं. यासाठीं गीतेंत जे जे विषय किंवा सिद्धान्त आले आहेत त्यांचे शास्त्रीयरीत्या प्रकरणशः विभाग पाडून, त्यांतील प्रमुख प्रमुख युक्तीवादांसह गीतारहस्यांत त्याचें प्रथम थोडक्यांत निरूपण केलें आहे; व त्यांतच प्रस्तुत कालच्या चौकस पद्धतीप्रमाणें गीतेच्या प्रमुख सिद्धान्तांची इतर धर्मांतील व तत्त्वज्ञानांतील सिद्धान्तांशी प्रसंगानुसार संक्षेपानें तुलना करून दाखविली आहे. या पुस्तकांत प्रथम दिलेला गीतारहस्य हा निबंध अशा रीतीनें कर्मयोगावर एक लहानसा पण स्वतंत्र ग्रंथच आहे असें म्हणतां येईल. पण कांही म्हटलें तरी अशा प्रकारच्या सामान्य निरूपणांत गीतेंतील श्लोकांचा[टंकनभेद] व्यक्तीशः पूर्ण विचार कारणें शक्य नव्हतें. म्हणून अखेर गीतेचें सर्व श्लोकाशः[टंकनभेद] भाषान्तर देऊन पूर्वापर संदर्भ लक्षांत येण्यास, किंवा पूर्वींच्या टीकाकारांनीं आपल्या संप्रदाय सिद्ध्यर्थ[टंकनभेद] गीतेंतील कांही श्लोकांची[टंकनभेद] कशी ओढाताण केली आहे (गी.३.१७- १९; ६.३; व १८.२ पहा [१]) हें स्पष्ट दाखविण्यास, अगर गीतारहस्यात सांगितलेल्या सिद्धान्तांपैकी गीतेंतील संवादात्मक पद्धतीप्रमाणें कोणकोणते सिद्धान्त गीतेंत कोठेंकोठें व कसे आले आहेत हें दाखविण्यास, टीकेच्या रूपानें भाषान्तरास जोडूनच जागोजाग मुबलक टीका दिल्या पद्धतीनें कांहीं मजकुराची द्विरुक्तीझाली आहे खरी; पण गीताग्रंथाच्या तात्पर्याबद्दल सामान्य वाचकांचा सध्यां जो गैरसमज झालेला आहे तो अन्य रीतीनें पूर्ण दूर होणें शक्य नाही, असें वाटल्यावरून गीतारहस्यविवेचन गीतेच्या भाषांतरापासून निराळें काढिलें आहे; आणि त्यामुळें वेदान्त, मीमांसा, भक्ती वगैरे बाबतीत गीतेचे जे सिद्धान्त आहेत, ते भारत, सांख्यशास्त्र, वेदान्तसूत्रें, उपनिषदें, मीमांसा वगैरे मूल ग्रंथातून कसे व कोठेकोठें आले आहेत, हे पूर्वेतिहासासह साधार दाखविण्यास, किंवा संन्यास व कर्मयोग या दोन मार्गांत भेद काय हें स्पष्ट करून सांगण्यास, अगर गीतेची इतर धर्ममतांशी व तत्वज्ञानांशी तुलना करून व्यावहारिक कर्मदृष्ट्या गीतेचें महत्त्व काय याचें योग्य निरूपण करण्यास, चांगली सोय झाली आहे. गीतेवर अनेक प्रकारच्या टीका होऊन होऊन गीतार्थ अनेकांनी अनेक प्रकारें जर प्रतिपदिला नसता तर आमच्या ग्रंथांतील सिद्धान्तास आधारभूत असलेली मूळ संस्कृत वचनें ठिकठीकाणीं देण्याचे कांहीं कारण नव्हतें. पण हल्लींचा काल तसा नसून आम्हीं सांगितलेला गीतार्थ किंवा सिद्धान्त बरोबर आहे की नाही, याबद्दल कित्येकांस शंका येण्याचा संभव आहे म्हणून आमच्या म्हणण्यास आधार काय याचा स्थलनिर्देश सर्वत्र केला असून, मुख्य मुख्य ठिकाणीं तर मूळ संस्कृत वचनेंच भाषान्तरसह दाखल केलीं आहेत. पैकीं बरींच वचनें वेदान्तग्रंथांतून सामान्यतः प्रमाणार्थ घेण्यांत येत असल्यामुळें वाचकांस त्यांची सहजगत्या माहिती होऊन

  1. साचा:संदर्भ हवा