पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० गीतारहस्य अथवा कर्मयोग

लोकांच्या शत्रुकडे जाऊन त्यांस मिळाला व "तुम्हास मी कधीहि अंतर देणार नाही" असे त्याने अभिवचन दिले. नंतर काही काळाने या शत्रूंच्या मदतीने रोमन लोकांवर चाल करुन मुलूख जिंकीत खुद्द रोम शहराच्या दरवाज्यापुढे त्याच्या सैन्याची छावणी येउन पडली. तेव्हा रोम शहराच्या स्त्रियांनी करॉयलेनसची बायको व आई यांस पुढे करुन मातृभूमीसंब्ंधाने त्याचे कर्तव्य काय याचा त्यास उपदेश केला, व रोमन लोकांच्या शत्रूस त्याने दिलेले अभिवचन त्यास मोडावयास लाविले! कर्तव्याकर्तव्याच्या मोहांत पडल्याची अशा प्रकारची दुसरीहि उदाहरणे जगाच्या प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहासांत पुष्कळ आहेत. पण इतक्या दूरवर जाण्याचे आपणांस कारण नाही. आपला महाभारत हा ग्रंथ अशा प्रकारच्याअ प्रसंगांची एक खाणच आहे म्हटले तरी चालेल. ग्रंथारंभी (आ. २) भारताचे वर्णन करितांना खुद्द व्यासांनी "सुक्ष्मार्थन्याययुक्तं" "अनेकसमयान्वित्ं" अशी त्यास विशेषणे देउन, त्यात सर्व धर्मशास्त्र, अर्थशास्त्र व मोक्षशास्त्र ही आली आहेत इतकेच नव्हे तर या बाबतीत 'यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वाचित" - यात आहे तेच इतर ठिकाणी आहे, आणि यात नाही ते दुसरे कोठेही नाही (आ. ६२.५३) - असे त्याचे महत्व गाइले आहे. किंबहुना संसारातील अनेक अडचणीच्या प्रसंगी थोरथोर प्राचीन पुरुषांनी कसे वर्तन केले याचा कथानकाच्या सुलभ रुपाने सामान्य जनांस बोध करण्यासाठीच भारताचे 'महाभारत' झालेले आहे; एरवी नुस्त्या भारती युध्दाचे किंवा 'जय' नामक इतिहासाचे वर्णन करण्यास अठरा पर्वे सांगण्याची काही जरुर नव्हती

कोणी असा प्रश्र्ण करील की श्रीकृष्णार्जुनांची गोष्ट सोडा; पण तुम्हाआम्हांस इतक्या खोल पाण्यात शिरण्याची जरुर काय? मन्वादिक स्मृतिकारांनी आपापल्या ग्रंथातून मनुष्याने संसारात कसे वागावे या बद्दल स्पष्ट नियम घालून दिले नाहीत काय? कोणाची हिंसा अगर घातपात करु नका, नीतीने वागा, खरे बोला, वडिल व गुरु यांचा मान ठेवा, चोरी किंवा व्याभिचार करु नका, वैगेरे सर्व धर्मातून सर्वास घालून दिलेल्या सामान्य मर्यादा जर पाळिल्या, तर मग तुमच्या या भानगडीत पडण्याचे कारण काय? पण उलट असेही विचारिता येईल की, जगातील यच्चयावत लोक जोपर्यंत या मर्यादेने वागू लागले नाहीत तो पर्यंत या लुच्च्या लोकांच्या जाळ्यात आपल्या सद्वर्तनाने सज्जनांनी आपणांस गुंतवून घ्यावे, किंवा त्यांच्या प्रतिकारार्थ जशास तसे होउन आपला बचाव करावा? शिवाय हे सामान्य नियम जरी नित्य व प्रमाण मानिले तरी कर्त्या पुरुषांवर पुष्कळदा असे प्रसंग येतात की ज्या ठिकाणी या सामान्य नियमांपैकी दोन किंवा अधिक नियमांची एकसमयावच्छेदेकरून प्राप्ति होत्ये; आणि मग "हे करू का ते करू" अशा