पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ रे

                      कर्मजिज्ञासा
              किं कर्म किमार्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: |*
                                      गीता ४.१६

भगवद्गितेच्या आरंभी दोन परस्परविरुध्द् धर्माच्या कैचीत सापडल्यामुळे कर्तव्यमूढ होउन अर्जुनावर जो प्रसंग आला होता तो काही अपूर्व नाही. संन्यास घेउन व जग सोडून रानांत रहाणाऱ्यांची किंवा दुबळेपणाने जगातील अनेक अन्याय् मुकाट्याने सोसुन घेणऱ्या अशक्त व उदरभरु लोकांची गोष्ट निराळी. पण समाजात राहूनच ज्या थोर व कर्त्या पुरुषांस संसारातील आपले कर्तव्य धर्माने व नीतीने बजावायचे आहे, त्यांवर अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा गुदरत असतात. अर्जुनाला कर्तव्यजिज्ञासा व मोह युध्दारंभी झाला, तर तोच मोह पुढे युद्धात मेलेल्या अनेक आप्तांची श्राध्दे करण्याची वेळ आल्यावर युधिष्ठिरास होउन तो शांत करण्यासाठी 'शांतिपर्व' सांगितले आहे. किंबहुना कर्माकर्मसंशयाचे असले प्रसंग हुडकून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठ्या कवीनी सुरस काव्ये अगर उत्तम नाटके रचिली आहेत. उदाहरणार्थ प्रसिध्द इंग्रज नाटककार शेक्सपीयर याचे 'हॅमलेट' नावाचे नाटक घ्या. डेन्मार्क् देशाचा प्राचीन राजपुत्र हॅमलेट याच्या चुलत्याने राज्यकर्त्या आपल्या भावाचा - म्हणजे हॅमलेटच्या बापाचा - खून करुन व हॅमलेटच्या आईशी मोतूर लावून गादिही बळकाविली होती. तेव्हा असल्या पापी चुलत्याचा वध करुन बापाच्या ऋणातून पुत्रधर्माप्रमाणे मुक्त व्हावे, किंवा सख्खा चुलता, पाटाचा बाप आणि तक्तनशीन राजा म्हणून त्याची गय करावी, या मोहात पडून कोवळ्या मनाच्या तरुण हॅमलेटची काय अवस्था झाली, आणि श्रीकृष्णासारखा योग्य मार्गदर्शक कोणी पाठराखा नसल्यामुळे वेड लागून अखेरीस 'जगावे का मरावे' याची विवंचना करण्यातच बिचाऱ्याचा कसा अंतझाला, याचे चित्र नाटकांत उत्कृष्ट् रीतीने रंगवले आहे. "करॉयलेन्स" नावाच्या दुसऱ्या नाटकांतही अशाच तर्हेचा आणखी एक प्रसंग शेक्सपीयरने वर्णीला आहे. करॉयलेनस नामक एका शूर रोमन सरदारास रोम शहराच्या लोकांनी शहरा बाहेर घालवल्यामुळे तो रोमन ‌------------------------------------------------------------------

  • "कर्म कोणते आणि अकर्म कोणते याबद्दल पंडितांनाही मोह पडत असतो." या स्थली अकर्म शब्द 'कर्माचा अभाव' आणि 'वाईट कर्म' या दोन्ही अर्थी यथासंभव घेतला पाहिजे. मूळ् श्र्लोकावरील आमची ीका पहा.