पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥अथ समर्पणम्॥

श्रीगीतार्थः क्व [टंकनभेद] गंभीर: व्याख्यात: कविभि: पुरा ।
आचार्यैर्यश्च बहुधा क्व[टंकनभेद] मेऽल्पविषया मति:॥
तथापि चापलादस्मि वक्तुं तं पुनरुद्यतः ।
शास्त्रार्थान् संमुखीकृत्य प्रत्नान् नव्यैः सहोचितैः ॥
तमार्याः श्रोतुमर्हन्ति [खात्रीचेटंकन?] कार्याकार्य-दिदृक्षव:[खात्रीचेटंकन?] [टंकनभेद]
एवं विज्ञाप्य सुजनान् कालिदासाक्षरैः प्रियैः ॥
बालो गांगाधरिश्चाऽहं तिलकान्वयजो द्विजः ।
महाराष्ट्रे पुण्यपुरे वसन् शांडिल्यगोत्रभृत ॥
शाके मुन्याग्नि वसुभू-संमिते शालिवाहने ।
अनुसृत्य सतां मार्गं [खात्रीचेटंकन?] स्मरंश्चापि वचो ऻ[खात्रीचेटंकन?] हरेः ॥
समर्पये ग्रंथमिमं श्रीशाय जनतात्मने ।
अनेन प्रीयतां देवो भगवान् पुरुषः परः ॥

---

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥

अनुवाद

श्लोक १.

श्रीगीतेचा अर्थ इतका खोल अन गंभीर आहे. जुन्या कवींनी आणि अनेक आचार्यांनी बहुत प्रकारे तो विशद केल्यावर त्यापुढे माझी अल्पबुद्धी ती काय? [१]

श्लोक २.

तरीही माझ्या उद्धटपणामुळे जुन्या आणि उचित अशा नवीन शास्त्रार्थांना समोर ठेवून गीतार्थ सांगण्यास मी पुन्हा तयार झालो आहे.

श्लोक ३ ते पुढे.

काय कार्य आणि काय अकार्य याचा निवाडा करण्याची इच्छा असलेले श्रेष्ठ लोक हा गीतार्थ ऐकण्यास पात्र आहेत. अशाप्रकारे सज्जन लोकांना प्रिय अशा कालिदासाच्या भाषेत मी कथन करीत आहे.

श्लोक ४.

(मी) टिळककुलोत्पन्न बाळ हा गंगाधराचा मुलगा असून शांडिल्य गोत्री ब्राह्मण आहे. महाराष्ट्रातील पुण्यपुरात(पुण्यात) राहतो.

श्लोक ५.

(मी) शालिवाहन शकाच्या १८३७ व्या वर्षी सज्जनांचा मार्ग अनुसरून हरिवचन स्मरून,

श्लोक ६.

हा ग्रंथ जनतेच्या आत्मारूपी देवास समर्पित करतो आहे. या ग्रंथामुळे परम पुरुष असा देव प्रसन्न होवो.

मूळ श्लोक

   यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।
   यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥ ९-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), यत्‌ = जे (कर्म), करोषि = तू करतोस, यत्‌ = जे, अश्नासि = तू खातोस, यत्‌ = जे, जुहोषि = हवन करतोस, यत्‌ = जे, ददासि = दान देतोस, (च) = आणि, यत्‌ = जे, तपस्यसि = तप तू करतोस, तत्‌ = ते सर्व, मदर्पणम्‌ = मला अर्पण, कुरुष्व = कर ॥ ९-२७ ॥

अर्थ

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. ॥ ९-२७ ॥

संदर्भ

  1. http://misalpav.com/comment/542617#comment-542617 मिसळपाव.कॉम संकेतस्थळावरील चर्चेत तेथील सदस्य श्री.बॅटमॅन यांनी अनुवादीत आणि http://misalpav.com/comment/542986#comment-542986 अन्वये प्रताधिकार मुक्त करून दिले ]