पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य ( पूर्वार्ध )

प्रथम मुद्रणाची प्रस्तावना.

गीतारहस्याचें हें दोन भागांत प्रथम मुद्रण आहे. या भागास टाइप जरा बारीक वापरला असून कागद चांगला पण पातळ आणि लहान आकाराचा वापरला आहे. त्यामुळें पुस्तक आटपशीर व वजनानेंहि हलकें झालेलें आहे. तथापि पूर्वी छापलेल्या चार मुद्रित आवृत्तींशीं सर्व प्रकारे साम्य ठेवण्यासाठीं हें पुस्तकहि पूर्वीप्रमाणेंच ओळीला ओळ पृष्ठाला पृष्ठ कायम राखून छापलें आहे. यांत अखेरच्या मुद्रणांत केलेल्या सर्व दुरुस्त्या आलेल्या आहेत. दोन वर्षांमागें गीता-रहस्यांतील गीतेचें भाषांतर रहस्य-संजीवन या नांवाखालीं निराळें छापल्यानंतर रहस्य-विवेचनाचा निबंध स्वतंत्र पुस्तक रूपानें छापणे क्रमप्राप्तच होतें, हे वाचकांस सांगावयास नको.

गीतारहस्य पृ.५०८ मधील उल्लेखाप्रमाणें ७४५ श्लोकांची[टंकनभेद] व चोवीस अध्यायांची एक भगवद्गीता[टंकनभेद] १९१७ सालीं मद्रासेस प्रसिद्ध झाली आहे पण ही मूळ गीता नसून ७०० श्लोकी[टंकनभेद] व अठरा अध्यायी मूळ गीतेसच कोणी तरी हें सांप्रदायिक स्वरूप दिलेलें असावें व गीतेंत ७४५ श्लोक[टंकनभेद] असल्याबद्दलचें महाभारतांतील वचनहि याच संप्रदायातर्फे महाभारतांत घुसडवून देण्यांत आलें असावें असें ग्रंथकाराचें मत आहे.

तृतीय मुद्रणाचा आटपसर आकार कांही लोकांस पसंत पडल्यामुळें त्यांचें सोईसाठीं तशा आकाराचें पुस्तक उपलब्ध असावें म्हणून हे मुद्रण ह्या आकारांत काढलें आहे.

पुणे ता. १ जानेवारी १९२६प्रकाशक.