पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०

गीतारहस्य अथवा कर्मयोग

देशांतहि अध्यात्मदृष्ट्या या प्रश्नांचा [टंकनभेद] ऊहापोह अद्याप चालूं असून सदर आध्यात्मिक ग्रंथकारांचे विचार गीताशास्त्रांतील सिद्धान्तांहून फारसे भिन्न नाहीत. गीतारहस्याच्या निरनिराळ्या प्रकरणांतील तुलनात्मक विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होईल. परंतु हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळें पाश्चात्य[टंकनभेद] पंडितांच्या मतांचा जो सारांश ठिकठिकाणी आम्ही दिला आहे, त्याबद्दल येथें एवढें सांगणे जरूर आहे की, गीतार्थ प्रतिपादन करणें हेंच आमचें मुख्य काम असल्यामुळें गीतेंतील सिद्धान्त प्रमाण धरून मग त्यांशी पाश्चिमात्य[टंकनभेद] नीतिशास्त्रज्ञाचें किंवा पंडितांचे सिद्धान्त कितपत जुळतात हें दाखविण्यापुरातच आम्ही पाश्चिमात्य[टंकनभेद] मतांचा अनुवाद केलेला आहे, व तोहि अशा बेतानें केलेला आहे की, सामान्य मराठी वाचकांस त्यातील मतलब लक्षांत येण्यास कठिण पडूं नये. अर्थात् दोहोंमधील बारीक भेद, - आणि हे पुष्कळच आहेत, - किंवा या सिद्धान्तांचे पूर्ण उपपादन व विस्तार ज्यास पाहणें असेल त्यानें मूळ पाश्चात्य[टंकनभेद] ग्रंथच पाहिले पाहिजेत, हें निर्विवाद आहे. कर्माकर्मविवेक किंवा नीतिशास्त्र यावर पहिला पद्धतशीर ग्रंथ आरीस्टाटल नांवाच्या ग्रीक तत्वज्ञानें लिहिला, असे पाश्चिमात्य[टंकनभेद] विद्वानांचे म्हणणें आहे. पण आमच्या मतें आरीस्टाटलच्याहि पूर्वी त्याच्यापेक्षां अधिक व्यापक व तात्त्विकदृष्ट्या या प्रश्नांचा[टंकनभेद] विचार महाभारतांत व गीतेंत केलेला असून, अध्यात्मदृष्ट्या गीतेंत प्रतिपादन केलेल्या नीतितत्त्वांपेक्षां दुसरे निराळें नीतितत्त्व अद्याप निघालेलें नाही. संन्याशाप्रमाणें राहून तत्वज्ञानाच्या विचारांत शान्तपणाने आयुष्य घालविणें बरें, किंवा अनेक प्रकारच्या राजकीय उलाढाली करणें बरें, याचा आरीस्टाटलनें केलेला खुलासा गीतेंत असून, मनुष्य जें कांही पाप करितो तें अज्ञानानेंच करितो असें जे साक्रेटीसाचें मत त्याचाहि एक प्रकारें गीतेंत समावेश झालेला आहे. कारण, ब्रम्हज्ञानानें[टंकनभेद] बुद्धि सम झाल्यावर त्याचे हातून कोणतेंच पाप घडणें शक्य नाहीं असा गीतेंचा सिद्धान्त आहे. पूर्णावस्थेस पोंचलेल्या परम ज्ञानी पुरुषाचें जें वर्तन तेंच नीतिदृष्ट्या सर्वांस कित्त्याप्रमाणें प्रमाण होय, हें एपिक्युरिअन व स्टोइक पंथांतील ग्रीक पंडितांचें मतहि गीतेस ग्राह्य असून, या पंथांतील लोकांनीं केलेलें परम ज्ञानी पुरुषाचे वर्णन व गीतेंतील स्थितप्रज्ञाचें वर्णन ही दोन्ही एकसारखीच आहेत. तसेंच प्रत्येकानें सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणें हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असें जे मिल्ल, स्पेन्सर,के ाॅट[टंकनभेद]इत्यादि आधिभौतिकवाद्यांचे म्हणणे, त्याचाही गीतेंत वर्णिलेल्या स्थितप्रज्ञाच्या "सर्वभूतहिते रतः" या बाह्य लक्षणांत संग्रह झालेला असून कान्ट व ग्रीन यांची नीतिशास्त्राची उपपत्ति व इच्छास्वातंत्र्याबद्दलचे सिद्धांतहि गीतेंत उपनिषदांतील ज्ञानाच्या आधारें दिलेले आहेत. गीतेंत यापेक्षां कांही जास्त नसतें तरीहि