पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग पनिषदांतील त्रिवृत्करणाच्या वर्णनावरून सुचलेली दिसत्ये कारण, तेणेंहि तेज, आप व पृथ्वी ही तत्त्वें प्रत्येक तीन तीन प्रकारें मनुष्याच्या देहांत आढळून येतात असें अखेर वर्णन आहे मूळ अव्यक्त प्रकृतीपासून, किंवा वेदान्तसिद्धान्ताप्रमाणं परब्रह्मापासून,अनेक नामरूपें धारण करणारे सींतील अचेतन म्हणजे निर्जीव किंवा जड पदार्थ कसे निर्माण झाले याचे विवेचन संपलेआतां सृष्टीतील सचेतन म्हणजे सजीव प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधानें सांख्यशास्त्र जास्त काय म्हणतो त्याचा विचार करून पुढे वेदान्तशा त्रांतील सिद्धान्तांशी त्याचा कितपत मेळ पडतो ते . मूळ प्रकृतीपासून निघा लेल्या पृथिव्यादि स्थूल पंचमहाभूतांचा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाला तृणजे सजीव प्राण्याचे शरीर तयार होते. पण हैं शरीर सेंद्रिय असले तरी जडच असतें. या इंद्रि यांना प्रेरणा करणारे तत्व जडप्रकृतहून निराळे असून त्यास पुरुष असे म्हण. तात. हा पुरुष मुळांत अकर्ता असून त्याचा प्रकृतीशी संयोग झाला म्हणजे सजीव सृष्टीस सुरवात होत्ये:व‘‘मी निराळ व प्रकृती निराळr^हैं ज्ञान झाल्यावर पुरुषाचा प्रकृतश झालेला संयोग मुटून तो मुक्त होतो, नाहीपेक्षां जन्ममरणाच्या फेच्यांत त्यास पडावें लागर्तः इत्यादि सांख्यांचे सिद्धान्त मागील प्रकरणांत सांगितले आहेत. पण पुरुष निराळा व प्रकृति निराळी हें ज्ञान नसतां मरण पावणाराच्या आत्म्यास म्हणजे सांख्यपरिभाषेप्रमाणे पुरुषास हे नवेनवे जन्म कसे प्राप्त होतात याचे विवे चन तेव्हां केलें नसल्यामुळे त्याबद्दल आतां जास्त विचार करणे जरूर आहे. झाना खेरीज जो मनुष्य मरतो त्याचा आत्मा प्रकृतीच्या चक्रांतून अजीबात सुटत नाही हैं उघड आहेकारण, तसें होईल तर ज्ञानाची किवा पापपुण्याची कांहींच मातव्यरी न रहातां, मेल्यावर प्रत्येक इसम प्रकृतपासून सुटतो किवा मोक्ष पावतो असें चार्वा काप्रमाणे म्हणावें लागेल. बरें; मेल्यावर नुस्ता आत्मा म्हणजे पुरुष शिल्लक राहून तो आपण होऊनच नवेनवे जन्म घेण्याचे काम करितो असे म्हटले, तर पुरुष अकर्ता व उदासीन असून सर्व कर्तृत्व प्रकृतीचे आहे या मूलभूत सिद्धान्तास बाध येतो. शिवाय आत्मा आपण होऊनच नवेनवे जन्म घेते असें मानिल्यास हा त्याचा धर्म होऊन जन्ममरणाच्याफेच्यांतून त्याची कधोंच सुटका व्हावयाची नाहीं,अशी अन वस्थाहि प्राप्त होत्ये म्हणून ज्ञानावांचून एखादामनुष्य मेला तरी त्याच्या आत्म्यासपुढे नवे जन्म प्राप्त करून देण्यास प्रकृतीचा त्याच्याशी संबंध राहिलाच पाहिजे असें सिद्ध होतें. तथापि मरणानंतर स्थूल देहाचा नाश होत असल्यामुळे हा संबंध आतां स्थूल महाभतात्मक प्रकृतीशी असू शकत नाहीं हैं उघड आहे. पण प्रकृति म्हणजे केवळ स्थूल पचमहाभूतेंच आहेत असे नाही. प्रकृतीपासुन एकंदर तेषीस तत्वें निर्माण होतात; व स्थल पंचमहाभूतें हीं या तेविसांपैकी शेवटचीं पांच होतही शेवटची १८४