पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविधार १२ ३ सदुणांच्या ज्या स्वाभाविक मनोवृत्ती त्याहि देवताच होत. या देवतांचीं शुद्ध स्व रूपें कोणतीं हें प्रत्येकास स्वभावतःच माहीत असतें. परंतु लोभामुळे, द्वेषानें, मत्स रानें, किंवा दुस-या अशाच कारणांनीं तो या देवतांचें स्फुरण जुमानीत नाही, त्यास देवतांनीं काथ करावें ! आतां हें खरें आहे कीं, किन्येकदां या देवतांमध्येंच लढा पड़न एखादं कृत्य करितांना कोणत्या देवतेची स्फूर्ति बलवत्तर मानावी याचा आप णांस संशय पडतोः आणि मग या संशयाच्या निर्णयार्थ न्यायकारुणयादि देवतां खेरीज दुस-या कोणाची तरी सलाघेणें जरूर पडतें. पण असल्या वेळीहि अध्यात्मवि चाराच्या किंवा सुखदुःखांच्या तारतम्याच्या भानगडींत न पडतां आपण आपल्या मनेोदेवतेची साक्ष घेतली तर सदर देवता दोहोंपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे याचा आपणांस झटकन निकाल देत असत्येः व त्याचमुळे वरील सर्वदेवतांपेक्षािं मनोदेवता श्रेष्ठ आहे. 'मनोदेवता' या शब्दांत मनांत असणा-या इच्छा, क्रोध, लोभ वगैरे सर्व विकारांचा समावेश न करितां, फक्त चांगलें किवा वाईट निवडण्याची जी ईश्वरदत्त किंवा स्वाभाविक शक्ति मनांत आहे तेवढीच प्रस्तुत प्रकरणीं विवक्षित धरावयाची.या शक्तीसच सदसद्विवेकबुद्धि': असें बडे नांव असून कोणात्याहि संश याच्या प्रसंगीं मनुष्यस्वस्थांतःकरणार्ने आणि शांतपणानें जर क्षणभर विचार करील तर ही सदसद्विवेचनदेवता त्यास कधीहि अंतर द्यावयाची नाहीं. किंबहुना अशा प्रसंगीं “ते आपल्या मनाला विचार' असेंच आपण दुस-यास सांगत असतों. को णत्या सद्रणाला कोणत्या वेळीं केिती महत्त्व टद्यावयाचें याची या बडयादेवतेजवळ एक यादनेहमींच तयार असून त्या यादाप्रमाणे वेळोवेळा ही मनेोदेवता आपला निकाल ताबडतोब दत असत्ये. समजा की, एखाद्या वेळी आत्मसंरक्षण आणि अ हिंसा यांचा तैटा पड़न दकाळाचे प्रसैगीं अभक्ष्य भक्षण करावें किंवा न करावें अशी आपणांस शंका आली तर आपण शांत चित्तानें या मनोदेवतेस कौल लावावा म्हणजे लागलीच “अभक्ष्य भक्षण कर” असा निर्णय बाहेर पडतो. तसेंच स्वार्थ आणि परार्थ किंवा परोपक्रार यांचा लढा पडल्यास त्याचाहि निर्णय या मनोदेवतेच्या कौलानें केला पाहिजे, मनेौदेवतेच्या घरची ही धर्माधर्मतारतम्याची यादी शांत विचारान्तीं एका ग्रंथकारास उपलब्ध होऊन त्यानें ती आपल्या ग्रंथांत प्रसिद्ध केली आहे.या थादीत नम्रतापूर्वक पूज्यभावाला पहिलें म्हणजे अत्युच स्थान दिलें

  • या सदसद्विवेकबुद्धीसच इंग्रजीत G11:c1etce असे म्हणतात; आणि आधिद

वत पक्ष म्हणजे IInt11uounist sch001 होय

  • या ग्रंथकाराचे नांव James Martineau (जेम्स मार्टिनो) असें असून यानें

नांवाच्या ग्रंथांत दिलेली आहे. मार्टिनो हा आपव्या पंथास 1dio-psychological नांव देती. पण आम्ही आधिदैवतपक्षांतच याचा समावेश करितों.