पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीर्ता ५३५ विषयांची एकवाक्यता होणें दुरापास्त आहे असा ज्यांचा पूर्वग्रह असतो त्यांस गीतेंतील पुष्कळ विधानं परस्परविरोधी आहत असा भास होत असतेो. उदाहरणार्थ, या जगांत जें कांहा आह तें सर्व निर्गुण ब्रह्म होय असें तेराव्या अध्यायांत तर उलट हें सर्व सगुण वासुदेवच आहे असें जें सातव्या अध्यायांत म्हटलें आह (७.१९), तें परस्परविरुद्ध असून, एकदां “मला शत्रु व मित्र सारखेच” (९.२९) तर दुसरे ठिकाणा “ज्ञानी व भक्तिमान् पुरुष मला अत्यंत प्रिय होत” (७.१७;१२.१९), असें जें भगवंतांनी सांगितले आहे तेंहेि पहिल्या सांगण्याच्या विरुद्ध आह, असें या आक्षेपकांचे म्हणणें आहे. पण वास्तविक पहातां हे विरोध नसून, एकाच गोष्टीबद्दल एकदां अध्यात्मदृष्टया तर एकदां भक्तिदृष्टया विचार करीत असतां हा दिसण्यांत विरोधी विधानें करावी लागली, तरी व्यापक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें गीतेंत अखेर त्यांचा मेळ घातलेला आहे, हें गीतारहस्यांत आम्हीं अनेक ठिकाणीं स्पष्ट करून दाखविले आहे. तथापि यावरहेि कित्येकांचे असे म्हणणें आहे कीं, अव्यक्त ब्रह्मज्ञान आणि व्यक्त परमेश्वराची भक्ति यांचा आतां जरी अशा प्रकारें मळ घालितां आला, तरी मूळच्या गीतेंत हा मळ घातलेला असणें संभवनीय नाही; मूळची गीता हल्लींच्या गीतेप्रमाणें विरोधप्रचुर नसून तींत वेदान्त्यांनीं किंवा सांख्यशास्राभिमान्यांनी आपआपल्या शास्रांचे भाग मागाहून घुसडून दिले आहेत. उदाहरणार्थ, प्रेो. गार्ब असें म्हणतो कीं, मूळ गीतेंत भक्तिचा फक्त सांख्य व येोग या दोहोंशींच मेळ घातलेला असून, वेदान्ताशी आणि मीमांसकांच्या कर्ममागीशीं भक्तीचा मेळ घालण्याचे काम मागाहून कोणीं तरी केलेले आहे; आणि मूळच्या गीतंत याप्रमाणे मागाहून कोणते श्वलोक घातले गेले याची आपल्या मताप्रमांणें एक यादहि त्यानें केलेल्या गीतेच्या जर्मन भाषांतराच्या अखेर दिलेली आहे! आमच्या मतें या कल्पना चुकीच्या आहेत. वैदिक धर्माच्या निरनिराळ्या अंगांची ऐतिहासिक परंपरा, आणि गीतेंतील सांख्य व योग या दोन शब्दांचे खरे अर्थ नीट लक्षांत न आल्यामुळे, व विशेषतः तत्त्वज्ञानविरहित म्हणजे नुस्त्या भक्तिपर ख्रिस्ती धर्माचाच इतिहास या लेखकांच्या डोळ्यांपुढे असल्यामुळे, अशा प्रकारचे भ्रम उत्पन्न झाले आहेत. ख्रिस्ती धर्म मूळांत केवळ भक्तिपर असून ग्रीक लोकांच्या किंवा इतर तत्त्वज्ञानाशीं त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न मागाहून झालेला आहे. पण आमच्याकडील गोष्ट तशी नाहीं. हिंदुस्थानांत भक्तिमार्गांचा उदय होण्यापूर्वीच मीमांसकांचा यज्ञमार्ग, उपनिषत्कारांचे ज्ञान, आणि सांख्य व योग, हीं सर्व परिपक्व दशेस आलेली होती. त्यामुळे या सर्व शास्रांस व त्यांतहि विशेषेकरून उपनिषदांताल ब्रह्मज्ञानास सोडून स्वतंत्रपणें प्रतिपादिलेला भक्तिमार्ग आमच्या देशांतील लोकांस मान्य होणें पहिल्यापासूनच संभवनाय नव्हतें; आणि हा असंभव लक्षांत आणिल.