पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५,३४ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट बरोबरच जीवाच्या उत्पत्तीबद्दलची कल्पनाहि गीतेस संमत आहे असा गैरसमज होण्याचा संभव होता. म्हणून क्षेत्रक्षेत्रज्ञविचारांत जीवात्म्याचे स्वरूप सांगण्याचा जेव्हां प्रसंग आला तव्हां म्हणजे गीतेच्या तराव्या अध्यायाच्या आरंभींच “आमचे क्षेत्रज्ञ म्हणजे जीव यांच्या स्वरूपाबद्दलचे मत भागवतधमीप्रमाणें नसतां उपनिषदांतील ऋषींच्या मतांप्रमाणे आहे’ असें स्वच्छ सांगावें लागलें; आाणि मग भिन्नभिन्न ऋषीनीं भिन्नभिन्न उपानषदांतून पृथक् पृथक् उपपादन केलॆ असल्यामुळे त्या सर्वाची ब्रह्मसूत्रांत केलेली एकवाक्यतोच(वे.सू ३.३.४३)आम्हांस संमत आहे असेंहि त्याबरोबरच सांगणें ओघानें प्राप्त झाले. अशा दृष्टीनें विचार केला म्हणजे भागवतधर्मावर ब्रह्मसूत्रांत जे आक्षेप घेतले आहेत ते दूर होतील अशा रीतीनें भागवतधर्मातील भक्तिमार्गाचा गीतंत समावेश केला आहे असें दिसून येईल रामानुजाचार्यांनी आपल्या वेदान्तसूत्रभाष्यांत वरील सूत्रांचे अर्थ फिरवून टाकिले आहेत (वे. सू. राभा. २.२.४२-४५पहा). पण आमच्या मतें हे अर्थ क्लिष्ट अतएव अग्राह्य आहेत. थिबो याचा कल रामानुजभाष्यांतील अर्थाच्या बाजूचा आहे; पण थिबोच्या लिाहण्यावरून त्याला या वादाचे स्वरूप नीट कळले आहे असें दिसत नाहीं. महाभारतांत शांतिपर्वाच्या अखेरीस नारायणीय किंवा भागवत धर्माचे जें वर्णन आहे त्यांतहिं वासुदेवापासून जीव म्हणजे संकर्षण उत्पन्न झाला असें वर्णन न करितां, “जेो वासुदेव तोच (स एव) संकर्षण म्हणजे जीव किंवा क्षेत्रज्ञ” असें प्रथम सांगून (शां.३३९. ३९ व ७१; आणि ३३४.२८ व२९पहा), संकर्षणापासून प्रद्युन्न हा पुढील क्रम मात्र दिला आहे; व एके ठिकाणीं भागवतधर्म कोणी चतुव्यूह, कोणी त्रिव्यूह, कोणी द्विव्यूह, आणि अखेर कोणी एकूव्यूहहि मानितात असें स्पष्ट म्हटले आहे(मभा शां. ३४८. ५७).पण भागवधर्मातील हे अनेक पक्ष न स्वीकारितां त्यांपैकीं क्षेत्रक्षेत्रज्ञाच्या परस्पर संबंधानें उपनिषदें व ब्रह्मसूत्रे यांस जुळेल तेवढे एकच मत हल्लींच्या गीतेंत कायम ठेवले आहे; आणि ही गोष्ट लक्षांत आणिली म्हणजे ब्रह्मसूत्रांचा उल्लेख गीतेंत कां करावा लागला याचा नीट उलगडा होतो. किंबहुना मूळ गीतेंत ही एक सुधारणाच केलेली आहे, असें म्हटले तरी चालेल. भाग ४-भाmधतधर्माचा उदय व गीता. उपनिषदांतील ब्रह्मज्ञान व कापिलसांख्यांतील क्षराक्षरविचार यांशीं भक्ति व विशेषतः निष्काम कर्म यांचा मेळ घालून कर्मयोगाचे शास्रीयरीत्या पूर्ण समर्थन करणे हा गीताग्रंथांतील मुख्य प्रतिपाद्य विषय होय, असें गीतारहस्यांत अनेक ठिकाणीं व पूर्वी या प्रकरणांतहि सांगितले आहे. पण इतक्या विषयांची एकवाक्यता करण्याची गीतेची सरणी ज्यांच्या पूर्ण लक्षांत भरत नाहीं, किंवा इतक्या