पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३-गीता व ब्रह्मसूत्रे ५३३ गीतेंत आलेला ब्रह्मसूत्राचा उल्लेख एकटा किंवा अपूर्व अतएव अविश्वसनीय नाहीं एवढे दाखविण्यासाठी या दुसच्या उल्लेखांचा उपयोग करण्यास आमच्या मतें कांहीं हरकत नाहीं.

    • ” इ० श्लोकांतील पदांच्या अथैस्वारस्याची मीमांसा करून भगवद्गीतंत हल्लींच्या ब्रह्मसूत्रांचा किंवा वेदान्तसूत्रांचाच उल्लेख केलेला आहे असें वर ठरावले आहे. पण भगवद्गीर्तत ब्रह्मसूत्रांचा हा उल्लेख येण्यास व तोहि तेराव्या अध्यायांत म्हणजे क्षेत्रक्षेत्रज्ञविचारांतच येण्यास आमच्या मतें दुसरेंहि एक महत्त्वाचे व सबळ कारण आह. भगवद्गातंतील वासुदेवभक्तीचे तत्त्व मूळ भागवत किंवा पांचरात्र धर्मातून जरी घेतले आहे, तरी वासुदेवापासून संकर्षण म्हणजे जीव, संकर्षणापासून प्रद्युम्न (मन) वृ प्रद्युम्नापासून पुढे अनिरुद्ध (अहंकार) उत्पन्न झाला असें जं चतुव्यूँहर्पांचरांत्रधर्मातील मूळचे जीवाच्या व मनाच्या उत्पत्तीबद्दलचे मत तें भगवद्गीतेस मान्य नाहीं हें आम्हीं पूर्वीच्या प्रकरणांतून सांगितले आह. जीवात्मा दुस-या कोणापासून उत्पन्न झालेला नाहीं (वे.सू.२.३. १७), व सनातन परमात्म्याचाच तो नित्य ‘अंश’ आहे (वे.सू. २ ३.४३), असा ब्रह्मसूत्रांचा सिद्धान्त आहे. त्यामुळे ब्रह्मसूत्रांच्या दुसच्या अध्यायाच्या दुसच्या पादांत वासुदेवापासून संकर्षण ही भागवतधर्मीय जीवाची उत्पत्ति संभवनीय नाहीं (वे.सू. २.२.४२) असें दूषण देऊन, जीवाचे मन हें एक इंद्रिय असल्यामुळे जीवापासून प्रद्युम्न (मन]उत्पन्न होणेहि शक्य नाहीं (वे. सू. २. २.४३); कारण लोकव्यवहार पहातां कत्यापासून कारण किंवा साधन उत्पन्न झालेले आढळून येत नाहीं; असें भागवतधर्माचे तेवढ्यापुरतें बादरायणाचार्यानं सयुक्तिक खंडन केले आहे. यावर भागवतधर्माचे असें उत्तर येण्याचा संभव आहे कीं, आम्ही वासुदेव (ईश्वर), संकर्षण (जीव), प्रद्युम्न (मन) व अनिरुद्ध (अहंकार) हे चारी सारखे ज्ञानी संमजतों व एकमेकांपासून एकमेकांची उत्पत्ति लाक्षणिक किंवा गौण मानितों. परंतु असें मानिलें तर एक मुख्य परमेश्वराच्या ऐवजीं चार मुख्य परमेश्वर होतात. म्हणून हें उतरहि समर्पक नाही असें ब्रह्मसूत्रांत म्हटलें असून, शेवटी परमेश्वरापासून जीव उत्पन्न झाला हे मत वेदांस म्हणजे उपनिषदांस विरुद्ध अतएव त्याज्य होय असा बादरायणाचार्यानी अखेर निकालकेला आहे (वे.सू.२.२.४४, ४५) भगवद्गीतेंत भागवतधर्मातील कर्मपर भक्तितत्त्व घेतलें आहे खरें; तथापि जीव वासुदेवापासून उत्पन्न झाला नसून नित्य परमात्म्याचाच जीव हा ‘अंश’ आहे, मुलगा नव्हे, असा गीतेचाहि सिद्धान्त आहे (गी. १५, ७) जीवाबद्दलचा हा सिद्धान्त मूळ भागवतधर्मातला नाहीं; यासाठी त्याला आधारकायहें सांगणे जरूर होतें. कारण, तसें न केले तर चतुव्यूह भागवतधर्मातील प्रवृतिपर भक्तितत्त्वा