पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\ን ጻ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट क्षेत्रज्ञाचा सविस्तर विचार ब्रह्मसूत्रांत केलेला आहे, असें गीतेंत* सांगितले. हल्लींच्या गीतेंत ब्रह्मसूत्रांचा जो हा उल्लेख आहे त्याच्याच तोडीचे सूत्रग्रंथाचे दुसरे उल्लेख हल्लीच्या महाभारतांत आहेत. उदाहरणार्थ, अनुशासनपर्वतं अष्टावकदिक्संवादांत“अनृताः स्रिय इत्येवं सूत्रकारो व्यवस्यति” (अनु.१९.६)असें वाक्य आह. तसेंच शतपथब्राह्मण (शांति.३१८.१६-२३), पंचरात्रे (शान्ति. ३३९.१०७), यास्काचे निरक्त (शांति.३४२.७१), आणि मनु (अनु.३७.१६), यांचाहिं इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे. परंतु गीतेप्रमाणें महाभारताचे सर्व भाग करण्याची वहिवाट नसल्यामुळे गीतखेरीज महाभारतांत अन्य ठिकाणीं उपलब्ध होणार इतर ग्रंथांचे उल्लेख कालनिर्णयार्थ कितपत विश्वसनीय मानावे अशी सहज शंका येत्ये, कारण, जे भाग तोंडपाठ करीत नाहींत त्यांत कोणतीहि गोष्ट अगर भ्ठीक प्रक्षिप्त घालण्यास केव्हांहि संधि सांपडणें कठिण नाहीं. तथापेि हल्लींच्या

  • ब्रह्मसूत्रे हा वेदान्तावरील मुख्य ग्रंथ आहे आणि त्याचप्रमाणें गीता हा कर्मयोगावरील प्रधान ग्रंथ आहे असे आम्ही पूर्वीच्या प्रकरणांतून दाखविलें आहे. तेव्हां ब्रह्मसूत्रं आणि गीता एकानेंच म्हणजे व्यासानें रचिली हें आमचे अनुमान खरें असल्यास व्यासाकडे या दोन्ही शास्रांचें कर्तृत्व येतें. आम्हीं ही गोष्ट अनुमानानं वर सिद्ध केली आहे. पण कुंभकाणस्थ कृष्णाचार्ये यांनीं महाभारताची दाक्षिणात्य पाठाप्रमाणे जी एक प्रत नुकतीच प्रसिद्ध केली आहेतींत शान्तिपर्वाच्या २१२ व्या अध्यायांत (वाष्णैयाध्यात्मप्रकरणांत) प्रथम युगारंभीं निरनिराळीं शाखे व इतिहास कसे निर्माण झाले याने वर्णन करितांना ३४ वा लोक खालीं लिहिल्याप्रमाणे दिला आहे--

वेदान्तकमैयोगं च वेदविद् ब्रह्मविद्विभुः । द्वैपायनो निजग्राह् शिल्पशास्त्रं भृगुः पुनः। यांत ‘वेदान्तकर्मयेाग हें एकवचनी एक पद् आहे पण त्याचा अथै ‘वेदान्त आणि कमैयेाग' असाच करावा लागतो..किबहुना ‘वेदान्तं कर्मयेागं चू ’ असा मूळ पाठ् असून लिहितांना किंवा छापितांना : न्तं ’ वरचा अनुस्वार सुटूला असेल असंहि वाटतें वेदान्त आणि कर्मयेाग हीं दोन्ही शाखे व्यासास प्राप्त झालीं व शिल्पशास्र भृगूला मिळालें, असं या श्लोकांत स्पष्ट म्हटलं आहे परंतु हा श्लोकू मुंबईत गुणपत कृष्णाजीच्या छापखान्यांत छापिलेल्या प्रतीतकिंवाकलकत्याच्याप्रतींत मिळतनूहिीं.कुंभकोणप्रतींतील शान्तिपर्वाचा २१२ वा अध्याय हू मुंबई व कुलकता येथील. प्रतीत २१० वा आहे. बुं ांतील हा श्लोकू आमचे मित्र डा, गणेश कृष्णू गर्दै यांनीं आमच्या नजरेस आर्णिलू याबद्दल आम्हीं त्यांचे आभारी आहों. त्यांच्या मृतं कर्मयोगशद्वानं गीताच या ठिकाणीं विवक्षित असून गीता आणि वेदान्तसूत्रं या दोहोंचेहि कर्तृत्व या श्रेोकांत व्यासांकडे दिलेले ओहे. महाभारताच्या तीन प्रतींपैकी एका प्रतीतच हा पाठ आढळतो म्हणून याबद्दल जराशंका येत्ये; पण कुांहीं म्हटले तरी वेदान्त आणि कर्मयेाग यांचा कर्ता एकचे आहे हें आमचं अनुमानं कांहीं नर्वे किंवा निराधार नाहीं एवढे त्यावरून सिद्ध होतें,