पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३ - गीता व ब्रह्मसूत्रे ५३ १

  • 'ब्रह्मसूत्रपदैः” या शब्दाचा शांकरभाष्यांतला अर्थ स्वीकारिला तर “हेतुमाद्भर्विनिश्चितैः” इत्यादि पदांचे स्वारस्य बिलकुल रहात नाहीं: आणि ब्रह्मसूत्रांतील ‘स्मृति' या शब्दानें गीतेखेरजि दुसरा कोणता तरी स्मृतिग्रंथ विवक्षित असावा असें मानिलें तर एकूणएक सर्वच भाष्यकार चुकले असे म्हणावें लागतं, व ते चुकले म्हटलें तरी ‘स्मृति' या शब्दानें कोणता ग्रंथ विवाक्षत आहे हें सांगतां येत नाहीं तें नाहीच. मग या अडचणीचे निवारण कसें होणार् ? आमच्या मतें या अडचणीतून सुटुका होण्यास एकच मार्ग आहे. ब्रह्मसूत्रे ज्यानं रचिली त्यानेंच मूळ भारतासंवगीतेस हल्लींचे स्वरूप दिलें असावें असे मानिलें म्हणजे कांहींच भानगड रहात नाहीं. ब्रह्मसूत्रांस ‘व्याससूत्रे’ असें म्हणण्याचा परिपाठअसून, ‘शेषत्वात्पुरुषार्थवादो यथान्येष्विति जैमिनिः” (वे. सू. ३.४.२) यावरील शांकरभाष्याच्या टीकंत जैमिनि हा वेदान्तसूत्रकार व्यास यांचा शिष्य होय असें आनंदगिरीनें लिहिले आहे,आणि त्याचप्रमाणे आपल्या आरंभींच्या मंगलाचरणांतहि “श्रीमद्धयासपयोनिधिनिधिरसौ” असें त्यानें ब्रह्मसूत्रांचे वर्णन केलें आहे. महाभारतकार व्यास यांचे पैल, शुक, सुमंत, जैमेिनि व वैशंपायन असें पांच शिष्य असून, त्यांस व्यासांनीं महाभारत पढविलें इत्यादि कथा हल्लींच्या महाभारताच्या आधारें आम्हीं वर दिली आहे. या दोन्ही गोष्टी जमेस धरून विचार केला म्हणजे मूळ भारत व तदन्तर्गत गीता यांस हल्लींचे स्वरूप देण्याचे व ब्रह्मसूत्रे रचण्याचे काम एकाच बादरायण व्यासांनीं केलें असावें असें अनुमान निघतें. बादरायणाचार्यानीं हल्लींचें महाभारत नवें रचिलें असा या म्हणण्याचा अर्थ नाहीं. महाभारतग्रंथ अतिविस्तीर्ण असल्यामुळे त्यांतील कांहीं भाग बादरायणाचे वेळीं लुप्त किंवा विस्खलित झालेले असतील; यासाठीं तत्कालीं उपलब्ध होणाच्या महाभारताच्या भागांचा शोध करून आणि जेथे जेथें ग्रंथ त्रुटित झालेला आढळण्यांत आला किंवा अशुद्ध अगर अपुरा वाटला तेथे तेथे त्याची शुद्धि अगर पूर्ति करून व अनुक्रमणिका वगैरे जोडून बादरायणाचार्यानीं या ग्रंथाचे पुनरुज्जीवन केलें असावें किंवा त्यास हल्लींचे स्वरूप दिलें असावें, असा आमच्या म्हणण्याचा आशय आहे. मराठी वाङ्मयांतहि ज्ञानेश्वरीची एकनाथांनीं याप्रमाणें शुद्धि केली हें प्रसिद्ध असून संस्कृतांत व्याकरणमहाभाष्यहि एकदां लुप्त झाल्यामुळे त्याचा चंद्रशेखराचार्यासं पुनः उद्धार करावा लागला अशी कथा आहे. महाभारताच्या इतर प्रकरणांत गीतेचे श्लोक कसे आले याचीहि उपपात आतां नीट लागत्ये; व गीतेंत ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख व ब्रह्मसूत्रांत ‘स्मृति’ या शब्दानें गीतेचा निर्देश कां आला याचाहि सहज उलगडा होती. हल्लींच्या गीतेस आधारभूत झालेली गीता बादरायणाचार्वाच्याहि पूर्वी उपलब्ध असल्यामुळे तिचा ब्रह्मसूत्रांत ‘स्मृति' या शब्दानें निर्देश केला; व महाभारताची शुद्धि करितांना क्षेत्र