पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३० गीतारहस्य अथवार्टुकर्मयेोग-परिशिष्ट्रे ४. १. १०, स्मरंति च । गीता ६.११. “शुचौ देशे०”इ० ४. २.२१. योगिन: प्रति च स्मर्यते । गीता ८.२३. “यत्र काले त्वनावृति मावृतिं चैव येोगिनः०” इ० वरील आठ स्थलांपैकी काहीं स्थलें जरी संग्दिध मानिलीं तरी आमच्या भतें चवथे (ब्र.सू.२.३.४५) व आठवें (ब्र.सू. ४.२.२१) ही स्थलें निःसंदह होत; आणि या बाबतीत शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य या चारी भाष्यकारांचे मत एकसारखें आहे ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. जीवात्माआणि परमात्मा यांचा संबंध काय याचा विचार करितांना सृष्टीतील इतर पदार्थाप्रमाणें जीवात्मा हा परमात्म्यापासून उत्पन्न झालेला नाही, असा “नात्माऽश्रुतेर्नित्यत्वाच्च ताभ्यः” (व्र.सू.२.३.१७) या सूत्रानें निर्णय करून, व जीवात्मा हा परमात्म्याचाच ‘अंश’ आह असें “अंशो नानाव्यपदशात्०” (२.३.४३) या सूत्रांत सांगून,पुढें “मंत्रवर्णाच” (२३.४४) असूाश्रुतीचा आधारदाखविल्यावर, अपि च स्मर्यते” (२.३.४५) म्हणजे “स्मृतिहिं तशीच आहे” हें सूत्र आले आहे. ही स्मृति म्हणजें “ममैवांशो जीवलेोके जीवभूतः सनातनः”(गी.१५.७) हें गीतेंतील वचन होय, असें सर्व भाष्यकार म्हणतात. परंतु याहिपेक्षां शेवटचे स्थल अधिक नि:संदेह आहे. देवयान व पितृयाण या दोन गतीत उत्तरायणाचे सहा महिने आणि दक्षिणायनाचे सहा महिने येतात, व त्यांचा अर्थ कालपर न करितां बादरायणाचार्य या शब्दांनी तत्तत्कालाभिमानी देवता समजतात (वे.सू.४.३.४), हें पूर्वी दहाव्या प्रकरणांत सांगितले आहे. दक्षिणायन व उत्तरायण या शब्दांचा कालवाचक अर्थ कधीच घ्यावयाचा नाहीं काय, अशी शंका येऊन “ योगिनः प्रति च स्मर्यते” (त्र.सू.४.२.२१) म्हणजे केवळ काल “स्मृतींत योग्यांना विहित आहत” हें सूत्र आले आहे; आणि “यत्र काले त्वनावृत्तिमावृतिं चैव योगिनः” (गी. ८.२३) या गीतावचनांत हे काल योग्यांना विहित आहेत असें स्वच्छ म्हटले आहे. यावरून भाष्यकार म्हणतात त्याप्रमाणें या दोन स्थलीं तरी ब्रह्मसूत्रांमध्यें “ स्मृति ’ या शब्दानें भगवद्गीताच विवक्षित आहे असें म्हणणें भाग पडतें. पण भगवद्गीतेंत ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख आणि ब्रह्मसूत्रांत ‘स्मृति’ या शब्दानें भगवद्गीतेचा निर्देश आहे असें मानिलें तर दोहींत कालदृष्टया विरोध उत्पन्न होतो. कारण, भगवद्गीतेंत ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे ब्रह्मसूत्रे गीतेच्या पूर्वीची ठरतात, आणि ब्रह्मसूत्रांत ‘स्मृति’ शब्दानें गीता उद्दिष्ट धरिली तर गीता ब्रह्मसूत्रांपूर्वीची ठरत्ये. एकदां ब्रह्मसूत्रे गीतेच्या पूर्वीची, तर पुनः तीच सूत्रं गीतेच्या नंतरचीं असणे शक्य नाहीं. बरें; या अडचणींतून सुटण्यास