पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३-गीता व ब्रह्मसूत्रे ५२९ लागूं होऊं शकत नाहीं असें सिद्ध होतें. म्हणून ‘ऋषिभिः बहुधा विविधैः पृथक्” आणि ‘‘हेतुमद्भिः विनिश्चितैः” या पदांचे विरोधात्मक स्वारस्य जर कायम ठेवावेयाचे असेल, तर गीतेंतील वरील *लोकांत “ऋषींनीं विविध छंदांनीं केलेलें अनेक प्रकारचे पृथकू” विवेचन म्हणजे निरनिराळया उपनिषदांतील संकीर्ण व पृथक् वाक्यें, आणि “ हेतुयुक्त व विनिश्चयात्मक ब्रह्मसूत्रपदें” या शब्दांनीं साधकबाधक प्रमाणे दाखवून अखेर सिद्धान्त ज्यांत नि:संदेह निश्चित केले आहेतं असें ब्रह्मसूत्रग्रंथांतील विवेचनच अभिप्रेत आहे असें म्हणणें भाग पडतें. दुसर असेंहि लक्षांत ठेविले पाहिजे कीं, उपनिषदांतील विचार ऋषीना जसे सुचले तसतसे म्हणजे विस्खलित रीतीनें सांगितले असल्यामुळे त्यांतील विचारांची एकवाक्यता केल्याखेरीज उपनिषदांचा भावार्थे नीट कळत नाहीं. म्हणून उपनिषदांबरोबरच त्यांची ज्या ग्रंथांत कार्यकारणहेतु दाखवून एकवाक्यता केली आह त्या वदान्तसूत्रांचाहि उल्लेख करणे जरूर होतें. गीतंतील लोकांचा याप्रमाणे अर्थ केला म्हणजे उपनिषदें आणि ब्रह्मसूत्रे गतिच्या पूर्वीचीं असली पाहिजेत असें उघड होतें. पैकी मुख्य मुख्य उपनिपदोंबद्दल तर वादच नाही. कारण, या उपनिषदांतील लोकच शब्दशः गीर्तत आलेले आढळतात. परंतु ब्रह्मसूत्रांबद्दल संशय घेण्यास जागा आहे; कारण, ब्रह्मसूत्रांत ‘भगवद्गीता' हा शब्द जरी साक्षात् आला नाही, तरी निदानपक्षों कांहीं सूत्रांत ‘स्मृति’ या शब्दानें भगवद्गीतेचाच निर्देश केलेला आहे असें भाष्यकार मानेितात. ज्या ब्रह्मसूत्रांत शांकरभाष्याप्रमाणे ‘स्मृति’ या शब्दानें गीतेचाच उल्लेख आहे, त्यांपैकी खाली दिलेली सूत्रे मुख्य होत. ब्रह्मसूत्रे-अध्याय, पाद व सूत्र. गी +ा-अध्याय व श्रुठीक. १.२. ६. स्मृतेश्व । गीता १८.६ १. ‘‘ईश्वरः सर्वभूतानां०” इ० लोक. १.३,२३. अपि च स्मर्यते । गीता १५.६ “न तद्भासयते सूर्यः०”इ० २.१.३६. उपपद्यत चाप्युपलभ्यते च । गीता १५.३; “ न रूपमस्येह तथोप लभ्यते०?? इ० २. ३.४५. अपि च स्मर्यते । गीता १५.७, ‘‘ ममैवांशो जीवलोके जीवभूतः ०’’ इ० ३.२.१७. दर्शयति चाथी अपि स्मयैते । गीता १३.१२. “ ज्ञेयं यत्तत् प्रव ६थामि ०” इ० ३.३ ३१. अनियमः सर्वासामविरोधः गीता ८.२३. ‘‘शुक्लकृष्णे गती ह्येते०” शब्दानुमानाभ्याम् । इ० गी. र. ३४