पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*ARと गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट असा ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख आहे, आणि हीं ब्रह्मसूत्रे व हल्लीचीं वेदान्तसूत्रे एकच मानिल्यास हल्लीच्या वेदान्तसूत्रानतर हल्लीची गीता झाली असावी असे प्राप्त होतें म्हणून ही ब्रह्मसूत्रे कोणती याचा गीताकालानर्णयदृष्टया अवश्य विचार करावा लागतो.* कारण, हल्लीच्या वेदांन्तसूत्रांखेरीज ब्रह्मसूत्रे या नांवाचा दुसरा ग्रंथ सध्यां उपलब्ध नाहीं अगर कोठे सांगितलेलाहेि नाहीं; आणि हल्लींच्या ब्रह्मसूत्रांनंतर गीता झाली असावी, हें म्हणणे शोभत नाही. कारण, गीता याहून प्राचीन आहे अशी परंपरागत समजूत आह. प्रायः ही अडचण लक्षांत आणूनच शांकरभाष्यांत “ब्रह्मसूत्रपदैः,” याचा अर्थ “श्रुतींतील किंवा उपनिषदांतील ब्रह्मप्रतिपादक वाक्यें” असा केला असावा असें दिसते. पण उलटपक्षीं शांकरभाष्यावरीलटीकाकार आनंदगिरी आणि रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे गीतेवरीलदुसर भाष्यकार ‘ब्रह्मसूत्रपदैचैव” या शब्दांना “अथातो ब्रह्मजिज्ञासा” या बादरॉयणाचायाँच्या ब्रह्मसूत्रांचाच या ठिकाणी निर्देश आहे असे म्हणतात; व श्रीधरस्वामी दोन्ही अथै देतात. या ?:लोकाचा खरा अथै कोणता हें स्वतंत्र रीतीनेंच आपणांस ठरविलें पाहिजे. क्षेत्रक्षेत्रज्ञविचार “ऋषंनी अनेक प्रकारें पृथक्” सांगितला असून त्याखेरीज (चैव) “हेतुयुक्त आणि विनिश्चयात्मक ब्रह्मसूत्रपदांनींहि” तोच अर्थ सांगितला आहे, अशा क्षेत्रक्षेत्रज्ञविचाराचीं दोन भिन्नभिन्न स्थले या »लोकांत वर्णिली आहेत,हें चैव' (आणखीहि) या पदांवरून उघड होतें. ही दोन स्थलें भिन्न आहेत एवढेच नव्हे, तर यांपैकी पहिले म्हणजे ऋषानी केलेलें वैर्णन “ विविध छंदांनीं पृथक् पृथक् म्हणजे तुटकें व अनेक प्रकारचे ” असून ‘ऋषिभिः’ या अनेकवचनं तृतीयान्त पदानें तें अनेक ऋषींनी केलेलें आहे, आणि ब्रह्मसूत्रपदांतील दुसरें वर्णन “हेतुयुक्त व विनिश्चयात्मक” आहे, असाहि या दोन वर्णनांतील विशष भद याच »लोकांत स्पष्ट केला आह. ‘हेतुमत हा शब्द महाभारतांत पुष्कळ टिकाणां अाला असून त्याचा अथै * नैट्याथिक पद्धतीनें काथैकारणें दाखवून केलेलें प्रतिपादन” असा आह. उदाहरणार्थ, जनकपुढें सुलभेनें केलेलें भाषण किवा श्रीकृष्ण शिष्टाईला गेले तेव्हा कौरवांच्या सभेत त्यांनी केलेलं भाषण ध्या. पहिले भाषण “हेतुमत् व अथेवत्” (शां. ३२०. १९१) तर दुसरें ‘सहेतुक' (उद्यो.१३१.२) असें महाभारतांतच म्हटले आहे. यावरून साधकबाधक प्रेमाणे दाखवून शेवटी कोणतेंहि अनुमान निःसंदेह रीतीनें ज्यांत सिद्ध केलें असतं त्या प्रतिपादनासच “हेतुमद्भिर्विनिश्चितैः” ही विशेषणें लागू पडतात; एके ठिकाणे कांही तर दुस-या ठिकाणी कांहा अशा उपनिषदांताल संकीर्ण प्रतिपादनास हे शब्द

  • या विषयाचा विचारकै तेलूग यांनी केला असूनु शिवाय सन १८९५ साली या विषयावर प्रो. तुकाराम रामचेद्र अंमळनेरकर बी.ए, यांनीं एक निबंध प्रसिद्ध केलेला आहे.