पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २-गीता व उपनिषदें ५२७ सूत्रानंतर तोच शब्द ‘चित्तनिरोधरूपी योग’ या एकट्याच अर्थी विशेषतः रूढ झाला असवा, असेंहि म्हणण्यास हरकत नाही. कसेंहिं असो; जनकादिकांनीं प्राचीन कालीं आचरिलेल्या निष्काम कर्माचरणाच्या मार्गाशीं गीतेंतला योग म्हणजे कर्ममार्ग सदृश असून मनु-इक्ष्वाकु इत्यादि परंपरेनें चालत आलेल्या भागवतधर्मातून तो घेतलेला आहे, पातंजल योगापासून निर्माण झालेला नव्हे, एवढे निर्विवाद आहे. गीताधर्म व उपनिषदं या दोहॅमध्यं सादृश्य व वैदृश्य कोणत्या बाबतीत आहे तें यावरून कळून येईल. या बार्बोपैकं बहुतेकांचा विचार गीतारहस्यांत ठिकठिकाणीं केलेला आहे. म्हणून थेथे अखेरीस थोडक्यांत एवढेच सागतों की, गीतेंतील ब्रह्मज्ञान जरी उपनिषदांच्याच आधारें सांगितले आहे तरी उपनिषदांतील अध्यात्मज्ञानाचाचकंवळ अनुवाद न करितां त्यांत वासुदेवभक्तीची आणि सांख्यशास्रांतील सृष्टयुत्पत्तिाकमाची म्हणजे क्षराक्षरज्ञानाचूं भर घालून सामान्य जनांस आचरण्यास सुलभ आणि उभयत्र श्रेयस्कर अशा वैदिक कर्मयोगधर्माचेच गीतेंत मुख्यत्वेंकरून प्रतिपादन केलें आहे; आणिं उपनिषदांपेक्षां गीतेंत जें कांहीं विशेष आहे तें हेंच होय. म्हणून ब्रह्माज्ञानाखेरीज इतर बाबतीत संन्यासपर उपनिषदांशों मेळ घालण्यासाठी गीतेची सांप्रदायिकदृष्टया ओढाताण करणे युक्त नव्हे. दोहींतील अध्यात्मज्ञान एक आहे खरें; तथापि अध्यात्मज्ञानरूपी डोकं एक असले तरी सांख्य व कर्ममार्ग हे वैदिक धर्माचे दोन तुल्यबल हात असून त्यांपैकीं ईशावास्योपनिषदाप्रमाणें ज्ञानयुक्त कर्मच कंटरवानें गीतेत प्रतिपादिले आहे, असें आम्हीं गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणांत स्पष्ट करून दाखविले आहे. भाग ३-गीता व ब्रह्मस्यूत्रे ज्ञानप्रधान, भक्तिप्रधान आणि येागप्रधान उपनिषदें व भगवद्गीता यांमध्ये सादृश्य किती आणि भदकोणूता याचा याप्रमाणे विचारकेल्यावर ब्रह्मसूत्रेव गीता यांची तुलना करण्याची वास्तविकरीत्या जरूर नाही. कारण, निरनिराळ्या उपनिषदांतून निरनिराळ्या ऋषींनीं सांगितलेल्या अध्यात्मसिद्धान्तांचेच पद्धतवार विवेचन करण्यासाठीं बादरायणाचार्यांच्या ब्रह्मसूत्रांची प्रवृति असल्यामुळे त्यांत उपानषदांपेक्षां निराळे विचार येणे शक्य नाही. तथापि भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायांत क्षेत्रक्षेत्रज्ञविचार चालू असतां आरंभाच ऋषिभिर्बहुधा गीतं छंदेोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मस्फूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः । क्षेत्रक्षेत्रज्ञाचे “अनेक प्रकारें विविध छंदांनी (अनेक) ऋषींनी पृथक् पृथकू, आणि हेतुयुक्त व पूर्ण निश्चयात्मक ब्रह्मसूत्रपदांनीहि विवेचन केले आह” (गी.१३.४),