पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Yʻ« %, गीातारहस्य अथवा कर्मयोग तात,”-म्हणजे तपस्व्यास किंवा संन्याशासच नव्हे तर यज्ञयागादि करणाच्या दीक्षितांसहि जी गति मिळत्ये तीच रणांगणांत पडणाच्या क्षत्रियास प्राप्त होत्ये, असा एक लोक दिलेला आह (कौटि.१०.३.१५०-१५२ व मभा.शां.९८-१००पहा). “युद्धासारखें स्वर्गाचे द्वार क्षत्रियाला क्वचित् उघडें सांपडतें; युद्धांत मेलास तर स्वर्ग, आणि जय मिळविलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल” (२.३२,३७), या गीतेंतीलउपदेशाचे तात्पर्यहि तेंच होय म्हणून संन्यास घेतला काय किंवा युद्ध केलें काय, फल सारखेच असेंहि सांख्यमार्गाप्रमाणें प्रतिपादन करितां येईल. तथापि कांहीं म्हटले तरी युद्ध केलेंच पाहिजे असा निश्चितार्थ या मार्गातील युक्तिवादानें पुरा सिद्ध होत नाहीं. सांख्यमार्गातील ही अडचण लक्षांत आणून भगवंतांनीं यापुढे कर्मयोगमार्गाच्या प्रतिपादनास सुरुवात केली असून गीतेच्या शेवटच्या अध्यायाच्या अखेरपर्यंत याच कर्मयोगाचे,-म्हणजे कमें केलींच पाहिजेत व तीं मोक्षाच्या आड न यतां उलट त। करीत असतांच मोक्ष कसा मिळतो याचे,निरनिराळीं प्रमाणें देऊन शंकानिवृतिपूर्वक समर्थन केले आहे. कोणतेंहि कर्म चांगळे किंवा वाईट हें ठरविण्यास त्या कर्माच्या वाह्य परिणामांपेक्षां कत्र्याची वासनात्मक बुद्धि शुद्ध का अशुद्ध हें प्रथम पाहिले पाहिजे, हें या कर्मयोगांतील प्रधान तत्त्व आह (गी.२.४९). परंतु वासना शुद्ध का अशुद्ध हें ठरविण्याचे कामहि अखेर व्यवसायात्मक बुद्धीचे असल्यामुळे निवडानिवड करणारं बुद्धींद्रिय स्थिर असल्याखेरीज वासनाहिं शुद्ध व सम होत नाही. यासाठी वासनात्मक बुद्धि शुद्ध होण्यास व्यवसायात्मक्र बुद्धीद्रियहि समाधीनें प्रथम स्थिर केले पाहिजे, असें त्या बरोबरच सांगितले आहे (गी.२.४१). जगांतील सामान्य व्यवहार पाहिला तर बहुतेक लेोक स्वगादि निरनिराळी काम्य सुखें प्राप्त होण्यासाठीच यज्ञयागादिवैदिक काम्य कर्माच्या खटाटोपांत पडलेले असतात, व त्यामुळे त्यांची बुद्धि आज हें फल मिळविण्यांत तर उद्यां तें फल प्राप्त करून घेण्यांत, म्हणजे स्वार्थतिंच गुंग झालेली आणि नेहमीं बदलणारी किंवा चचल असत्ये, असें आढळून येतें. पण अशा लेोकांस स्वर्गसुखादिक अनित्य फलापेक्षांजास्त महत्त्वाचे अर्थात् मोक्षरूपी नित्य सुख मिळणे शक्य नाही. म्हणून वैदिक कर्माची ही काम्य खटाटोप सेोडून निष्काम बुद्धीनें कर्म करण्यास शीक; कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार असून त्यांचे फल मिळणे किंवा न मिळणें ही गेोष्टकेव्हांहितुझ्या ताब्यांतली नाहीं (२.४७); फलदाता परमेश्वर आहे असें मानून, कमीचे फल मिळो वा न मिळो सारखेंच, अशा समबुद्धीनें केवळ कर्तव्य म्हणून जीं कर्मे करितात त्यांच्या पापपुंण्याचा लेप कत्यास लागत नाहीं; म्हणून या समबुद्धीचाच आश्रय कर; या समबुद्धीलाच योगम्हणजे पाप न लागतां कर्मे करण्याचा युक्ति-असें म्हणतात; हा योग तुला सा