पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति ××* भगवान अर्जुनाला पहिल्यानें असें सांगतात कीं, सांख्यमार्गातील अध्यात्मज्ञानाप्रमाणें आत्मा हाअविनाशी व अमर असल्यामुळे“भीष्मद्रोणादिकांना मी मारणार”हो तुझी समजूतच खेोटी आहे. कारण, आत्मा मरत नाहीं व मारीतहि नाही. मनुष्य ज्याप्रमाणे आपली वस्ने बदलतो त्याप्रमाणें आत्मा एकदेहसोडून दुस-यादेहांत जातो इतकेंच; पण त्यामुळे तो मेला असें मानून शोक करणें युक्त नव्हे. बरें;“मी मारणार? हा भ्रम मानिला तरी युद्ध कां करावें असें म्हणशील, तर शास्रतः प्राप्त झालेल्या युद्धापासून परावृत न होणे हा क्षत्रियधर्म आहे; आणि या सांख्यमार्गात ज्या अर्थी प्रथमतः वर्णाश्रमविहित कमें करणे हेंच श्रेयस्कर मानितात. त्या अर्थी तूं तसें नू करशील तर तुला लोक नांवें ठेवितील; किंबहुना युद्धांत मरणे हाच क्षत्रिथाचेा धर्म होय. मग व्यर्थ शोक कां करितोस ? मा मारणार आणि तो मरणार ही नुस्ती कर्मदृष्टि सोडून देऊनू, मी आपूला केवळ स्वधर्म करीत आहं या बुद्धीनें तूं आपलें प्रवाहपतित कार्य कर म्हणजे त्यापासून तुला कोणतेंहि पाप लागणार नाहीं. सांख्यमार्गाप्रमाणे हा उपदेश झाला. परंतु चित्तशुद्धेिसाठी प्रथमतः कर्मे करून चित्तशुद्धि झाल्यावर अखेर सवै कर्म सोडून संन्यास घेणेच जर या मार्गाप्रमाणें श्रेष्ठ समजतात, तर उपरति झाल्याबरोबर युद्ध न करितां साधल्यास एकदम संन्यास घेणें बरें नव्हे काय ? ही शंका शिल्लक रहात्ये. गृहस्थाश्रम पुरा करून मग म्हातारपणीं संन्यास घ्यावा, तारुण्यांत गृहस्थाश्रमचकेला पाहिजे अशी मन्वादि स्मृतिकारांची आज्ञा आहे, असे म्हटल्यानें निर्वाह लागत नाहीं. कारण, केव्हां तरी संन्यासघेणेंच जर श्रेष्ठ, तर जेव्हां संसाराचा वाट येईल तेव्हांच विलंब न करितां संन्यास घेणें युक्त होय; व याच हेतूनें उपनिषदांतहि “ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत् गृहाद्वा वनाद्वा” अशीं वचनें आहेत (जा.४). संन्यास घेऊन जी गति मिळणार तीच रणांगणांत मरण आल्यानें क्षत्रियास प्राप्त होत्ये. $. ○ * to, द्वाविमौ पुरुषव्याघ्र सूर्यमंडलभेदिनी । परित्राड्योगयुक्तूंश्च रणे बाभिमुखेन हृत्ः ॥ “हें पुरुषव्याघ्रा ! सूर्यमंडलाला भेदून ब्रह्मलोकास जाणारे दोनच पुरुष आहेत; एक योगयुक्त संन्यासी व दुसरा रणांत तोंड देऊन लढत असतां मलेला,”असे महाभारतांत (उद्येो.३२.६५) म्हटलें असून कौटिल्याच्या म्हणजे चाणक्याच्या अर्थशंस्त्रिांत याच अर्थी

  • حي يخه * यान् यज्ञसंघैस्तपसा च विप्राः स्वर्गैषिणः पात्रस्रयैश्च यांति । क्षणेन तानपयतियांति दाराः प्राणान् सुयुद्धेषु परित्यजंतः ॥ “स्वगाची इच्छा करणारे ब्राह्मणं अनेक यज्ञांनी, साहित्यपात्रांनीीं, व तपानें ज्या लेोकांप्रत जातात, त्याहिपलीकडे युद्धांत प्राण देणार शूर पुरुष एका क्षणांत पोच