पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१६ गीतारहस्य अथवा कमेयोग-पाराशष्ट ठिकाणीं सांगितलें पाहिजे. महाभारताच्या अनुशासनपर्वात तर “मनुनाभिहितं शास्र” (अनु.४७.३५) असा मनुस्मृतीचा स्पष्टच उल्लेख आहे. शब्दसादृश्याच्या ऐवजीं अर्थसादृश्य पाहिले तरीहि हेंच अनुमान दृढ होतें. गीतंतील कर्मयोगमार्ग आणि प्रवृत्तिपर भागवत किवा नारायणीय धर्म यांतील साम्य आम्हीं पूर्वीच्या प्रकरणांतृम दाखविलेंच आहे. वासुदेवापासून संकर्षण, संकर्षणापासून प्रद्युम्न, प्रद्युम्नापासून अनिरुद्र आणि अनिरुद्धापासून ब्रह्मदेव अशी जी व्यक्त सृष्टीच्या उपपतीची परंपरा नारायणीय धर्मौत दिली आहे (शां ३३९. ७१,७२) ती गीतंत घेतलेली नसून याशिवाय गीतेतील धर्मात आणि नारायणीय धर्मात दुसरहि कित्येक भेद आहत हें खरें. पण चतुव्यूंह परमेश्वराची कल्पना गीतेस मान्य नसली, तरी एकव्यूह वासुदवाचं भक्ति हाच राजमार्ग होय; दुसच्या कोणत्याहि देवतेची भक्ति केली तरी तंा वासुदेवाचीच भक्ति होत्ये; भक्त चार प्रकारचे असतात; भगवद्भक्तानें स्वधर्माप्रमाणे सर्व कर्मे करून यज्ञचक्र चालू ठेविलें पाहिजे; संन्यास घेणें योग्य नाहीं; इत्यादि सिद्धान्तांचा विचार केला तर गीतेंतील धर्म आणि भागवतधर्म हे एकच आहत असे आढळून येते. आणि विवस्त्रान्-मनुइक्ष्वाकु इत्यादि संप्रदायपरंपराहि दोहॉकडे एकच आहे हें पूर्वी सांगितले आहे. तसेंच गीतेंतला वेदान्त किवा अध्यात्मज्ञानहि सनत्सुजातीय, शुकानुप्रश्न, किंवा याज्ञवल्क्यजनकसवाद इत्यादि प्रकरणांत अगर अनुगीतेंत प्रतिपादन केलेल्या ब्रह्मज्ञानाशी मिळतें आहे, हें सदर प्रकरणें वाचिल्यास कोणाच्याहि लक्षांत येईल. कापिलसांख्यशास्रातील २५ तत्त्वें व गुणेोत्कर्षाचा सिद्धान्त कबूल करूनहि भगवद्गीता प्रकृति आणि पुरुष यांच्याहि पलीकडे असणारें तत्त्व ज्याप्रमाणे नित्य मानित्ये, तद्वतचू सांख्यांच्या २५तत्त्वांपलीकडे ‘साव्वसावें’तत्त्व असून त्याचे ज्ञान झाल्याशिवाय कैवल्य प्राप्त होत नाही असें शांतिपर्वात वसिष्ठकरालजनकसंवादांत आणि याज्ञवल्क्यजनकसंवादांत सविस्तर प्रतिपादन कॅलें आहे. कर्मयोग किंवा अध्यात्म या दोन विषयांसंबंधानेंच हें विचारसाम्य आढळून येतें असें नाही; तर या दोन मुख्य विषयांखेरीज गीतेंत जे दुसरे पोटविषय आहेत त्यांच्या तोडीची प्रकरणेंहि महाभारतात इतरत्र आलेली आहेत. उदाहरणार्थ, गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या आरंभीच दुर्योधनानें दोन्ही सैन्यांचे द्रोणाचार्याजवळ जसें वर्णन केलें तसेच वर्णन पुढे भीष्मपर्वत ५१ व्या अध्यायांत त्यानें पुनः द्रोणाचार्याजवळचकेलें आह. पहिल्या अध्यायाच्या उत्तरार्धात अर्जुनाला जो विषाद झाला आहे, त्याच तोडीचा विषाद पुढे युधिष्ठिराला शांतिपर्वाच्या आरंभी झाला असून, भीष्म व द्रोण याचे ‘योगानें’ वध करण्याची वेळ आली तेव्हां अर्जुनाच्या तोंडांतून पुनः अशाच प्रकारचे विषादप्रचुर उद्गर निघाले आहेत (भीष्म. ९७.४-७व१०८. ८८-९४).