पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता व महाभारत ५१५ हें शब्दसाम्य सोडून देऊन, केवळ वरील यादीतील श्वलोकसादृश्याचा जरी विचार केला तरी महाभारतांतील इतर प्रकरणे आणि गाता ही एकाच्याच हातचीं असावीं असें म्हटल्याखेरीज निभाव लागत नाहीं. प्रकरणशः विचार केला तर वरील ३३ लोकांपैकी १ मार्कडेयप्रश्नांत ई मार्कडेयसमस्येंत, १ ब्राह्मणव्याधसंवादांत, २ विदुरनीतीत, १ सनत्सुजातीयांत, १ मनुबृहस्पतिसंवादांत, ६ई शुकानुप्रश्नांत, १ तुलाधारजाजलिसंवादांत, १ वसिष्ठकराल व याजवल्क्यजनकसंवादांत, १ई नारायणीय धर्मति, २ई अनुगीतंत आणि बाकी भीष्म, द्रोण, कर्ण व स्री पर्वातून आलेले असून, यांपैकीं प्रायः सर्व ठिकाणीं हे »लेोक पूर्वापर संदर्भाला धरून योग्य स्थलीं आले आहेत, प्रक्षिप्त नव्हेत, असें आढळून येईल किंबहुना कृॉहीं *लोक गीतंतच समारोपदृष्टया घेतलेले दिसतात. उदाहरणार्थ, “सहस्रयुगपर्यंतं” (गी. ८.१७ हा क्षेोक समजण्यास वर्ष, युग यांच्या व्याख्या पूर्वी देणे जरूर होतें; आणि भारतांत (शां.२३१) व मनुस्मृतींत त्यांची लक्षणे पूर्वी देऊन नंतर हा *लोक दिला आहे. परंतु गीतेंत हा *लोक या युगादिकाच्या व्याख्या न देतां एकदम सांगितला आह. अशा दृष्टीनें विचार केला म्हणजे महाभारताच्या इतर प्रकरणांत हे श्वलोक गीतेंतूनच घेतलेले असतील असें म्हणतां येत नाहीं; आणि इतक्या निरनिराळ्या प्रकरणांतून गीतेत हे सर्व »लेोक घेतलेले असणेंहि संभवत नाहीं. तेव्हां गीता आणि हीं प्रकरणें लिहिणारा पुरुष एकच असला पाहिजे असें अनुमान करणें भाग पडतें. मनुस्मृतींतील अनेक »ठीक ज्याप्रमाणें महाभारतांत आढळतात* तद्वत् गीतेंतला “सहस्रयुगपर्यंतं०” (८. १७) हा सबंध श्वलोकथोड्या पाठभेदानें आणि “श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्”(गी. ३. ३५ वगी. १८. ४७) हें श्लोकार्ध ‘श्रेयान्’ या ऐवजीं ‘वरं’ या पाठभेदानें, व “सर्वभूतस्थमात्मनं०” हें श्लोकार्ध (गी. ६. २९) “सर्वभूतेषु चात्मनं” अशा भेदानें मनुस्मृतीत उपलब्ध होतात (मनु. १. ७३: १०. ९७; १२. ९१), हेंहि या असे श्लोकपाद म्हणजे चरण इं ल अधिक सांपडतील. त्यापैकीं कांहीं येथे देतों-किं இங்: ဂ္ယီဒွါ ဒွါရှိ ੰ भयात् (२.४०), अशान्तस्य कुत:सुखम् ( २.६६), उत्सीदेयुरिमे लोकां:( ३.२४), मनो चलमू (६.३५), ममात्मा भूतभावनः (९.५), मोवाशा मोघुकर्माणे: (९.१२), सेसः सर्वेषु भूतेषु (९.२९), दीप्तानलेोकैद्युर्ति० (११.१७), सवैभूतर्हृिते रताः (१२.४), तुल्यर्निदीस्तुतिः (१२.१९), संतुष्टो येन केनवित् (१२.१९), सेमलोष्टाश्मकांचनः (१४. २४), त्रिर्वेिधा कंमवोदनी (१८.१८), निर्ममः शान्तः (१८.५३), ब्रह्मभूयाय कल्पने ੰ श्नोक महाभारतांत सांपडतात याची यादी बुल्ह्रसाहेबांनीं लई बी ‘प्राच्यधर्मपुस्तकमालेत' प्रसिद्ध केलेल्या मनूच्या इंग्रजी भाषांतरास ရှိႏိုင္တူ आहे ती qĘT (S.B.E. Vol. XXV. pp 531 ff.).