पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता व महाभारत ५११ अशा समजुतीमुळे ही शंका प्रथम निघालली आहे. पण ही समजूतच आधीं खरी नाही असें आम्ही पूर्वी सविस्तर दाखविलें असल्यामुळे आतां ही शंका वास्तविक म्हटले म्हणजे राहूं नये. तथापि एवढ्या पुराव्यावर अवलंबून न रहातां इतर पुराव्यानें देखील ही शंका खोटी कशी ठरत्ये तें आतां सांगतों. कोणतेहि दोन ग्रंथ एकाच ग्रथकाराचे आहेत किवा नाहीत अशी शंका आल्यास काव्य-मीमांसक प्रथमतः शब्दसादृश्य व अर्थसादृश्य या दोन गोष्ट्राचा विचार करीत असतात. पैकी शब्दसादृश्यांत नुस्त्या शब्दांचाच नव्हे, तर एकंदर भाषासरणीचाहिं समावेश होतो. या दृष्टीनें विचार करावयाचा म्हणजे गीतेची भाषामहाभारताच्या भाषेशीं कितपत जुळत्ये हें पाहिले पाहिजे. परंतु महभारत ग्रंथ अतिविस्तृत असल्यामुळे प्रसंगानुसार त्यांत भाषेची रचनाहि निरनिराळी आहे. उदाहरणार्थ, कर्णपर्वातील कर्णार्जुनांच्या युद्धाचे वर्णन पाहिले तर त्यांतील भाषासरणी इतर प्रकरणांतील भाषेहून निराळी आहे असें दिसून येईल. म्हणून गीतची भाषा महाभारताच्या भाषेशी जुळत्ये का नाहीं हें निश्चित सांगणें दुर्घट होय. तथापि सामान्यतः विचार केला तर कै. काशीनाथपंत तेलंग* म्हणतात त्याप्रमाणे गीतेची भाषा व छंदोरचना आर्ष किंवा प्राचीन आहे असें म्हणावें लागतें. उदाहुरणार्थ, अंत (गी. २.१६), भाषा (गी. २ ५४) त्रह्म (=प्रकृति, गी. १४.३), योग(=कर्मयोग),पादरपूरक अव्यय ‘ह’ (गी. २.९)वगैरे शब्द गीतेंत ज्या अर्थानें आले आहेत त्या अर्थी ते कालिदासादिकांच्या काव्यांतून आढळून येत नाहीत असें काशीनाथपंतांनी दाखविलें असून, पाठभेदानें कां होईना पण गीता ११ ३५ वा श्वलोकांत ‘नमस्कृत्वा’ असा अपाणिनीय शब्द व गी.११.४८यांत ‘शक्य अहं? असा अपाणिनीय संधिहि आहे. तसेंच “सेनानीनामहं स्कंद.” (गी. १०.२४) यांतील ‘सेनानीनां’ ही षष्ठीहि पाणिनीप्रमाणें शुद्ध नाही. आर्ष वृत्तरचनची उदाहरणें कै. तेलंग यांनीं खुलासेवार दिलीं नाहींत. पण अकराव्या अध्यायांतील विश्वरूपवर्णनाच्या (गी.११.१५-५०) छत्तीस लोकांस उद्देशूनच त्यांनी गीतेची छंदोरचना आर्ष आहे असें म्हटलें असावें असें आम्हांस वाटतें, या »ठोकांच्या प्रत्येक चरणांत अकरा अक्षरं आहत; पण गणाचा नियम नसून एक चरण ईद्रवज्रा तर दुसरा उपेंद्रवज्रा, तिसरा शालिनी तर चवथा आणखी निराळ्याच प्रकारचा,

  • कै. काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनी केलेलें भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर मॅक्समुलर साहेबांनीं संपादिलेल्या प्राच्यधमैपुस्तकमालेंत (Sacred Books of the East Series, Vol. VIII.) प्रसिद्ध झाले आहे. या प्रथास इंग्रजीतच गीतेवर एक

टीकात्मकं लेखूप्रस्तावनेच्या रूपानें जोडिला आहे.कै,तेलंग यांच्या मताचे या प्रकारणांत जे उल्लेख आहेत ते (एका स्थलाखेरीज) या प्रस्तावनेस अनुलक्षून རྙེད་ན་ཡིི་ आहेत.