पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*YY गीतारहम्य अथवा कर्मयोग पुष्कळ उदाहरणे आहेत; व त्याप्रमाणें अर्जुनाचीहि सहज वाट लावतां आली असती. संन्यास घेण्यासाठी वस्ने भगवीं करण्यास मूठभर काव, किंवा भक्तीनें भगवन्नामसंकीर्तन करण्यास टाळमृदंगादि साहित्यहि, उभ्या कुरुक्षेत्रांत मिळालें नसतें असें नाहीं. परंतु तसें कांहींएक न करितां उलट दुसच्या अध्यायाचे आरंभीच “अरे! ही अवदसा (कश्मल) तुला कोठून आठवली? हा हिजडेपणा (कँब्य) तुला शोभत नाहीं ! हा तुझ्या कीर्तींचे वाटोळे करील ! म्हणून हें दुबळेपण (दौर्बल्य) सोडून देऊन युद्धाला उभा रहा !” असें श्रीकृष्णानें अर्जुनास सांगितले आहे. तथापि अर्जुनाने भागुबाईप्रमाणें पुनः पहिलीच रडकथा गाऊन “मी भीष्मद्रोणादि महात्म्यांस कसें मारूं ? मरणे बरें का मारणे बरें, या संशयांत माझें मन गोंधळून गेले आहे; म्हणून यांपैकीं कोणता धर्म श्रेयस्कर तें मला सांगा; मी तुम्हांला शरण आलों आहे.” असें दीनवाण्या मुद्रेनें सांगितल्यावर, याला अक्काबाईनें पुरें घेरिलें असें श्रीकृष्णाच्या नजरेस आलें; व जरा हसल्यासारखें करून “अशोच्यानन्वशोचस्त्वं०” इत्यादि ज्ञान त्यास सांगण्यास भगवंतानीं सुरुवात केली आहे. अर्जुन ज्ञानी पुरुषाप्रमाणें वागूं चाहात असून कर्मसंन्यासाच्या बाता सांगूं लागला होता. म्हणून जगांत ज्ञानी पुरुषाच्या आचरणाचे “कर्म सोडणे” व “कर्म करणें” असे जे दोन पंथ म्हणजे निष्ठा आढळून येतात तेथपासूनच भगवंतांनी आपल्या उपदेशास आरंभ केला आह; आणि या दोन्ही निष्ठांपैकी कोणतीहि निष्ठा घेतली तरी तूं चुकत आहेस हें अर्जुनास भगवंतांचे पहिलें सांगणे आहे. नंतर ज्या ज्ञान किंवा सांख्य निष्ठेच्या आधारें अर्जुन कर्मसंन्यासाच्या गोष्टी बोलू लागला होता त्या सांख्य निष्ठेच्या आधारें प्रथम “एषा तेऽभिाहता बुद्धिः” (गी.२.११--३९)येथपर्यंत उपदेश केला असून पुढे अध्यायाच्या शेवटापर्यंत कर्मयोगमार्गाला धरून युद्ध हेंच तुझें खरें कर्तव्य असें अर्जुनास सांगितलें आह. “एषा तेऽभिहिता सांख्ये०” यासारखा श्रलोक “अशोच्यानन्वशोचस्त्वं०” या »ठोकाच्या पूर्वी आला असता तर हाच अर्थ अधिक व्यक्त झाला असता, पण संभाषणाच्या ओघांत सांख्यमागीचे प्रतिपादन झाल्यावर “हें सांख्यमार्गाप्रमाणें प्रतिपादन झालें; आतां योगमार्गाप्रमाणें प्रतिपादन सांगतों.” अशा रूपानें तो आला आहे. कसेंहि झाले तरी अर्थ एकच. सांख्य (किंवा संन्यास) आणि योग (किंवा कर्मयोग) यामधीलभेद पूर्वी अकराव्या प्रकरणांत आम्हीं स्पष्ट करून दाखविला आह. म्हणून त्याचा पुनरुक्ति न करितां एवढेच सांगतों कीं, चित्तशुद्धीसाठीं स्वधर्माप्रमाणें वर्णाश्रमविहित कर्म करून ज्ञानप्राप्ति झाल्यावर मोक्षासाठीं शेवटीं सर्व कर्मे सोडून संन्यास घेणें यास सांख्य, आणि कर्म कधींहि न सेोडितां शवटपर्यंततीच निष्काम बुद्धीनें करीत रहाणे यास योग किंवा कर्मयोग असें म्हणतात.