पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० ६ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट वनपर्वात ब्राह्मणव्याधसंवादांत व्याधानें मी आपला मांसविक्रयाचा धंदा कांकरितों याचेवेदान्ताच्या आधारें विवेचन केलें असून, शांतिपर्वात तुलाधार-जाजलिसंवादांतहिं तशाच प्रकारें तुलाधारानें आपल्या वाणिज्यधंद्याचे समर्थन केलें आहे (वन. २०६-२१५ आणि शां.२६०-२६३). पण ही उपपति त्या त्या विशिष्ट धंद्यापुरती झाली. तसेंच अहिंगा, सत्य वगैरे विपयांचे विवेचन जरी महाभारतांत ठिकठिकाणी आलेलें अहं तरी हंहि एकदेशीय म्हणजे त्या त्या विषयापुरतें असल्यामुळे, महाभारताचा तो प्रधान भाग म्हणता येत नाही, किंवा ज्या श्रीकृपणाच्या आणि पाडवांच्या थोर कृत्याचे वर्णन करण्याकरितां व्यासांनी महाभारत लिहिलें त्या थोर पुरुषाच्या चरित्रागा किंता घेऊन मनुष्यमात्रानें चालावें किवा नाहीं, याचाहिं अराल्या एकदेशीय विवेचनानें निर्णय लागत नाहीं. संसार नि:सार असून केव्हां तरी संन्यास घेणेंच जर श्रेट्ट, तर श्रीकृष्ण अगर पांडव यानी असल्या उलाढाल कां कराव्या आणि त्यांनी त्या कोणत्याहि हेतूनें केल्या असल्या तरी लोकसंग्रहार्थ त्यांचा गौरव करून व्यासांनीं सर्वध तीन वर्ष एकसारखें खपून (मभा.आ. ६२.५२) एक लाग्व ग्रंथ तरी कशाली लिहावा, असे प्रश्न सहज उत्पन्न होतात. वर्णाश्रमकर्म चित्तशुद्धं राठी अहित असें म्हटल्यानें या प्रश्नांचा नीट उलगडा होत नाही. कारण, काही म्हटले तरी स्वधर्भाधरण किंवा जगाचे इतर व्यवहार संन्यासदृष्टीनें गौणच म।-ावे लागतात. यासाठी महाभारतांत ज्या थेार पुरुषांची चरित्रे वर्णिली आहत त्या महात्म्यांच्या वर्तनावर “मूले कुठारः” या न्यायानें येणा-या वरील अक्षिपाचे निरसन करून संसार करावा कीं नाही, आणि करावा म्हटल्यास संसारात प्रत्येक मनुष्थानें कोणत्या रीतीनं आपआपले धंदे केले असतां तें कर्म मोक्षप्राप्ताच्या आड येत नाही, हें महाभारतांत कोठे तरी सविस्तर सांगणें जरूर होतें. परंतु नलोपाख्यान, रामोपाख्यान वगैरे जो उपाख्यानें महाभारतांत आहेत त्यांत हें विवेचन करणे युक्त झालं नसतें. कारण मग त्या उपागाप्रमाणे हें विवेचनहिं गौणच भानिले गेले असतं. तसेंच वनपर्व किंवा शातिपर्व यांतील अनेक विषयांचे खिचडीत गीतेचा संग्रह केल्यानें तिच्या महत्त्वास कमीपणा आल्याखेरीज राहिला नसता म्हणून उद्योगपर्व संपून महाभारतांतील प्रधान कर्म जें भारती युद्ध त्यास सुरुवात होण्याच्या ऐन प्रसंगीं त्थावरच नीतिधर्मदृष्टया दिसण्यांत अपारहार्य असा आक्षप घेऊन कमीकर्मविवेचनाचें हें स्वतंत्र शास्र तेथंच सोपपातिक सांगेितले आहे. सारांश, श्रीकृष्णानं। युद्धारंभींच अर्जुनास गीता सांगितली ही परंपरागत कथा क्षणभर बाजूला ठेवून महाभारत हें धर्माधर्मनिरूपणार्थ रचिलेलें एक आर्ष महाकाव्य आहे अशा बुद्धीनें जरी विचार केला, तरी गीता सांगण्यास भारतांत जी स्थलयोजना केली आह तीच गीतेचे महत्त्व लोकांचे लक्षांत भरण्यास काव्यदृष्टयाहि