पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट-प्रकरण गीतेचे बहिरंगपरीक्षण. سیمسجد جامع مساجه حسامسسه अविदित्वा ऋषि छंदो दैवतं योगमेव च । योऽध्यापयेज्जपेद्वाऽपि पापीयाञ्जायते तु स: ॥* स्मृटfते. भा युद्धांतू होणाच्या भयंकर कुलक्षयाचे व ज्ञातिक्षुयानें प्रत्यक्षं स्वरूप प्रथमत: डोळ्यापुढे आल्यावर आपला क्षात्रधर्म सोडून संन्यास घेण्यास तयार झालेल्या अर्जुनास त।ळ्यावर आणण्यासाठीं,कर्मयोग अधिक श्रेयस्कर आणि कर्मयोगांत बुद्धि प्रधान असून ब्रह्मात्मैक्यज्ञानानें किंवा परमेश्वरभक्तीनें साम्यास पोचलेल्या बुद्धीनें स्वधर्माप्रमाणें कमें करीत राहण्यानेंच मोक्षप्राप्ति होत्ये, मोक्ष मिळण्यास याखेरीज दुसच्या कशाची अपेक्षा रहात नाही, असें वदान्तशास्राच्या आधारें प्रतिपादन करून श्रीकृष्णांनीं अर्जुनास युद्ध करण्यास कसें लाविलें याचे मागील प्रकरणांतून सविस्तर वर्णन केले आह गीतेचे खरं तात्पर्य काय याचा याप्रमाणे निर्णय झाल्यावर गीताग्रंथ केवळ वेदान्ताचा व निवृतिपर आहे अशा गैरसमजुतीनें “गीता भारतांत घालण्याचें कांही कारण नाही” इत्यादि ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत त्याचेहि आतां सहज निवारण होतें. कारण, कर्णपर्वात सत्यानृताचे विवेचन करून श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे अर्जुनास युधिष्ठिरवधापासून निवृत्त केले, त्याप्रमाणेच गीतेंतील उपदश युद्धास प्रवृत करण्यासाठी जरूर होता; आणि काव्यदृष्टया पाहिले तरीहि महाभारतांत अशा रीतीचे ज दुसरे अनेक प्रसंग जागोजाग आले आहत त्या सवोतील मृलतत्त्व कोठे तरी सांगणें अवश्य असल्यामुळे तें भगवद्गीतेत सांगून व्यावहारिक धर्माधर्मीच्या किवा कार्यकार्यव्यवस्थितीच्या निरूपणाचा पूर्तत अखेर गीतेंत केली आहे, असें आतां सिद्ध होतें.

  • “कोणत्याहि मंत्रा वा ऋपि, छद्, दैवतृ अणि विनियोग न जाणतां (सदर मत्र) जो शिकवितो किंवा त्याचा जप करिती ती पापी होतो.’ हें कोणत्या तरी स्मृतिग्रथातल वचन आहे, पण कोठलं त सांपडत नाही. पण त्याच मृळ आर्षेय ब्राह्मण (आर्पय. ?) या श्रुतिग्रंथांत आहे; तें असें--“यो ह वा अंविदितार्पयन्छन्दोदैवतब्राह्मणेन मत्रण याजयति वाऽध्यापयति वां स्थाणु वच्छैति गर्त वा प्रतिपद्यते । ’ कोणत्याहि मंत्राची ऋषि, छंद वगैरे बहिरंगें होत; व तीं मृाहीत असल्याखेरीज मत्र म्हणूनये. हाच न्याय गीतेसारख्या ग्रंथासहि लागू केला पाहिजे.