पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंह्वार ५०३ वर आहे अशा दृष्टीनें मानवी कृत्यांचा विचार करणाच्या नुस्त्या आधिभौतिक ज्ञानास कधींहिं हार न जाणारा अतएव नित्य व अभय झाला आहे, व हिंदु लोकांस या बाबतीत दुस-या कोणत्याहि ग्रंथाकडे, धर्माकडे किंवा मताकडे पहाण्याची अपेक्षा भगवंतांनी ठेविलेली नाही, असें दिसून येईल. किंबहुना सर्व ब्रह्मज्ञानाचे निरूपण केल्यावर “अभयं वै प्राप्तोऽसि”-श्रुातां तूं अभय झालास-(बृ.४.२.४), असे याज्ञवल्क्यानं जें जनकराजास सांगितलें अहिं तेंच या गीताधर्माच्या ज्ञानासहि अनेकार्थी अक्षरशः लागू पडतें असं म्हटले तरी चालेल. अशा रीतीनें सर्वतोपरी निर्भय व व्यापक असूनू सम म्हणजे वर्णाचा, ज्ञातीचा, देशाचा किंवा दुसरा कोणताच भेद न ठेवितां सवाँस एकाच मापानें एकच सद्रति देणारा,व इतर धर्मौबद्दल योग्य सहिष्णुता दाखविणारा,ज्ञान-भक्ति-कर्मयुक्त गीताधर्म सनातन वैदिकधर्मवृक्षाचे अत्यंत मधुर व अमृतफल आहे. वैदिक धर्मात प्रारंभीं द्रव्यमय किंवा पशुमय यज्ञाचे म्हणजे नुस्त्या कर्मकांडाचेच अधिक माहात्म्य होतें. पण पुढे उपनिषदांतील ज्ञानानें ही केवळ कर्मकांडपर श्रौतधर्म गौण ठरविल्यावर त्यांतच सांख्यशास्राचाहि प्रादुभव झाला. पण हें ज्ञान सामान्य जनांस अगम्य असून त्याचा ओढाहि कर्मसंन्यासाकडे विशेष असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे केवळ औपनिषदिक धमीनें किवा दोहोंच्या स्मार्त एकवाक्यतेर्नेसुद्धां पूर्ण समाधान हींणे शक्य नव्हतं. यासाठी उपनिषदांतील केवळ बुद्धिगम्य ब्रह्मज्ञानास प्रेमगम्य व्यक्त उपासनेच्या राजगुह्याची जोड देऊन, कर्मकांडाच्या प्राचीन परंपरेप्रमाणे “तुम्ही आपआपल्या योग्यतेनुरूप आपआपला सांसारिक कर्तव्यें लोकसंग्रहाथै निष्काम बुद्धीनें, आत्मौपम्यदृष्टीनें व उत्साहानें यावजीव करीत राहून तद्द्वारा पिंडत्रह्मांडांत सर्वभूती एकत्वानें भरलेल्या नित्य परमात्मदेवतेचे नेहमीं यजेन करा, त्यांतच तुमचे पारलौकिक व ऐहिक कल्याण आहे,” असें अर्जुनास निमित्त करून सर्वासच गीताधर्म कंठरवानें सांगत आहे; व त्यामुळे कर्म, बुद्धि (ज्ञान) आणि प्रेम (भक्ति) या तिहामधील विरोध नाहीसा होऊन सर्व आयुष्यच यशमय करण्यास सांगणांच्या एका गीताधर्मात सकल वैदिक धर्माचे सार अलेि आहे. हा नित्य धर्म ओळखून केवळ कर्तव्य म्हणून सर्वभूतहितार्थ शेकडों खटाटोप करणारे महात्मे व कर्त पुरुष जेव्हां या भरतभूमीस अलंकृत करीत होते तेव्हां हा देश परमेश्वराच्या कृपेस पात्र होऊन ज्ञानाच्याच नव्हे तर ऐश्वर्याच्याहिं शिखरास पॉचला होता; अाणि हा उभयत्र श्रेयस्कर पूर्वतर धर्म सुटला तेव्हां त्याला निकृष्ट स्थिति प्राप्त झाली हें कोणासहि सांगावयास नको. यासाठीं भक्तीची, ब्रह्मज्ञानाची व कर्तृत्वाची जोड घालून देणा-या या सम आणि तेजस्व गीताधमीनें परमेश्वराचे यजनपूजन करणारे सत्पुरुष पुनः या देशांत उत्पन्न होवोत अशी भगवंतांची अखेर