पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०२ गीतारहम्य अथवा कर्मयोग बुडाशा जें अव्यक्त तत्त्व आहे तें ईद्रियांना अगोचर म्हणजे अर्थातच निर्गुण असल्यामुळे,गुण,वस्तु,अगर किया दाखविणाच्या कोणत्याच शब्दांनी या निर्गुण तत्त्वाचे वर्णन होऊँ शकत नाहीं, व म्हणूनच त्यास अज्ञय म्हणतात. परंतु अव्यक्त सृष्टितत्त्वाचे आपणांस होणारें ज्ञान शब्दांनीं अधिक सांगतां न येणारें अतएव दिसण्यांत जरी अल्प दिसलें, तरी तेंच मानवी ज्ञानाचे सर्वस्व असल्यामुळे लौकिक नीतिमतेची उपपतिहि त्याच्या आधारेंच सांगितली पाहिजे; व ती योग्य रीतीनें सांगण्यास कोणतीच अडचण पडणार नाही हेंगीतंतील विवेचनावरून सहज दिसून येईल. दृश्य सृष्टीतील हजारों व्यवहार कोणत्या पद्धतीनें चालवावे-उदाहरणार्थ, व्यापार कसा करावा, लढाई कशी मारावी, रोग्यास कोणतें औषध केव्हां द्यावें, सूर्यचंद्रादिकांची अंतरें कशी मोजावी,-हें नीट समजण्यास नामरूपात्मक दृश्य सृष्टींच्या ज्ञानाची नेहमी अवश्यकता लागणार, आणि हा लौकिक व्यवहार आधिकाधिक कौशल्यानें करितां येण्यास नामरूपात्मक आधिभौतिक शास्राचेंच जास्त जास्त अध्ययन केलें पाहिजे या बद्दल शंका नाहीं परंतु गीतेचा तो विषय नव्हे. अध्यात्मदृष्टया मनुष्याची परमश्रेष्ठ अवस्था कोणती तें सांगून त्याच्या आधारें कर्माकर्मरूप नीतिधर्माचे मूलतत्त्व काय ते ठरविणे हा गीतेचा मुख्य विषय होय. पैकीं आध्यात्मिक परमसाध्य जें मोक्ष त्याबद्दल आधिभैतिक पंथ यद्यपि उदासीन असला, तरी केवळ नीतिधर्माच्या मूलतत्त्वांचा निर्णय करण्यासहि आधिभौतिकपक्ष अपुरा पडतो, आणि प्रवृतिस्वातंत्र्य, किवा नीतिधर्माचे नित्यत्व, अगर अमृतत्व प्राप्त करून घेण्याची मनुष्याच्या मनांतील स्वाभाविक इच्छा, इत्यादि गूढ विषयांचा त्यानें निकाल लागत नाहीं, यासाठी आत्मानात्मविचारांत शिरणें अखेर भाग पडतें, हें आम्हीं पूर्वीच्या प्रकरणांतून दाखविले आहे. परंतु अध्यात्मशास्राचे कोम एवढयानेच संपते असें नाहीं. जगाच्या बुडाशा असणाच्या अमृतत्वाचा नित्य उपासनेनें आणि अपरोक्षानुभवानें मनुष्याच्या आत्म्याला एक प्रकारची विशिष्ट शांति मिळून त्यामुळे मनुष्याच्या शीलांत किवा स्वभावांत जो फरक होती तोच सदाचरणाचे मूळ असल्यामुळे, मानवजातीची पूर्ण अवस्था कृशांत आहे या प्रश्नाचाहिं अध्यात्मशास्रानें जसा निर्णय होतेो तसा केवळ आधिभौतिक सुखवादानें होत नाहीं हें लक्षांत ठेविले पाहिजे. कारण, केवळ विषयसुख हें पशुंचे साध्य असून ज्ञानवान् मनुष्याच्या बुद्धीचे त्यानें कधीच पूर्ण समाधान होणे शक्य नाहीं, व सुखदुःखें अनित्य असून धर्म नित्य आहे, हें पूर्वीच सविस्तर प्रतिपादन केले आहे. अशा दृष्टीनें विचार केला म्हणजे गीतेंतीलं पारलौकिक धर्म आणि नीतिधर्म मिळून दोन्हीहि जगांतील नित्य व अमृत तत्त्वाच्या आधारें प्रतिपादिलेले असल्यामुळे परमावधीचा हा गीताधर्म, मनुष्य हें एक केवळ उच्च प्रतीचे जना