पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहारं ५० १ नित्शे यांचा हा उपदेश खिस्ती धर्मासारख्या तत्त्वज्ञानविरहित नुस्त्या आधिदैवत भत्तिधर्मास जरी विरोधी असला,तरी अध्यात्मदृष्टया सवैभूतात्मैक्यज्ञानरूप साध्याच्या किंवा कर्मयोगी स्थितप्रज्ञाच्या पूर्णावस्थेच्या पायावर रावलेल्या धर्माधर्मशास्रांतील किंवा नीतिशास्रांतील परम ध्येयाच्या पोटांत वरील सर्व आधिभौतिक साध्यांचा आविरोधानें सहज समावेश होतो;व त्यामुळे अध्यात्मज्ञानानें परिपूत झालेला वैदिक धर्म त्यानें केव्हां तरी मार्गे पडेल अशी भीति बाळगण्याचे कारण नाहीं. परमसाध्य अव्यक्त मानणें जर जरूर आहे तर तें मानवजातीपुरतेंच संकुचित कां धरावें ? किवा पूर्णावस्था हेंच जरी परमसाध्य मानिलेतरी जनावर आणि मनुष्य या दोहींसहि सामान्य अशा आधिभौतिक साध्यापेक्षां त्यांत अधिक काय ? असे उलट प्रश्न या ठिकाणां उत्पन्न होतात; आणि या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूं लागलें म्हणजे अध्यात्मदृष्टया निष्पन्न होणाच्या सर्व चराचर सृष्टीच्या एका अनिवौच्य परम तत्त्वासच शरण जावे लागते. आधुिभौतिक शास्रांची अर्वाचीन काळुीं अथूतपूर्ववाद झाली असून दृश्य सृष्टीचे मनुष्याचे ज्ञान पूर्वीपेक्षां शंकडॉपट वाढले आहे; आणि ‘जशास तसें’ या न्यायानें जें प्राचीन राष्ट्र हें आधिभौतिक ज्ञान सपादन करून घेणार नाही त्याचा सुधारलेल्या नवीन पाश्चिमात्य राष्ट्रांपुढे टिकाव लागणे अशक्य होय, हें निर्विवाद आहे. परंतु आधिभौतिक शास्रांचा कितीहि वाढ झाली,तरी जगाचे मूलतत्त्व समजून घेण्याची मनुष्यमात्राची जी स्वाभाविक प्रवृत्ति तिचे नुस्त्या आधिभौतिकवादानें पूर्ण समाधान होणें केव्हांच शक्य नाही. कवळ व्यक्त सृष्टीच्या ज्ञानानें सर्व निर्वाह लागत नसून नामरूपात्मक दृश्य सृष्टीच्या बुडाशीं कांही तरी अव्यक्त तत्त्व असले पाहिजे असें स्पेन्सरसारखे उत्क्रांतिवादीहि प्रांजलपणें कबूल करितात. पण त्यांचे असे म्हणणे आहे कीं, या नित्य तत्त्वाचे स्वरूप काय हें समजणें शक्य नसल्यामुळे त्याच्या आधारें कोणत्याच शास्त्राची उपपात लावितां येत नाही. जर्मन तत्त्ववेत्ता कान्ट हाहि अव्यक्त ग्वृष्टितत्त्वाचे अज्ञेयत्व कबूल करती तथापि नीतिशास्त्राची उपपति याच अगम्य तत्त्वानें लावली पाहिजे असें त्याचे मत आहे. शोपेनहौएर यापुढे जाऊन हें अगम्य तत्त्व वासनास्वरूपी आहे असें प्रतिपादन करीत असून नीतिशास्रावरील इंग्रजी ग्रंथकार ग्रीन याच्या मतें हेंच (दृष्टितत्त्व आत्मा या रूपानें अंशतः मनुष्याचे देहांत प्रादुर्भूत झालेले आहे, आणि गीता तर “ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः” असे स्पष्ट म्हणत आहे. जगाच्या बुडाशी असणारें हें अव्यक्त तत्त्व नित्य, एक, अमृत, स्वतैत्र व आत्मरूपी आहे, यापेक्षां त्याबद्दल ज्यास्त कांही सांगतां येत नाहीं, असा आमच्या उपनिषदत्कारांचा सिद्धान्त असून या सिद्धान्तापलीकडे मनुष्याच्या ज्ञानाची गति कधीं तरी जाईल की नाहीं याचा वानवाच आहे. कारण जगाच्या