पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसगति ४४३ उद्गार निघाले; व “मलाच शबूंनी ठार मारिले तरी चालेल; पण त्रैलोक्याच्या राज्यासार्टा देखील पितृहत्या, गुरुहत्या, बंधुहत्या किंवा कुलक्षय यांसारखी घेोर पातकें मी करूं इच्छत नाही.” असें त्यानें श्रीकृष्णास सागितले. त्याच्या सर्वागाला कंप सुटला, हातपीय गळाले, व तोंड कोरडें पडून खिन्नवदन होत्साता हातचे धनुष्यबाण टाकून देऊन तो बिचारा आपल्या रथात खाली बसला, इतकी कथा पहिल्या अध्यायांत आहे. या अध्यायास “अर्जुनवेिषादयोग” असें म्हणतात. कारण, सर्व गीतेत ब्रह्मविद्यान्तर्गत (कर्म-)योगशास्त्र हा एकच विषय जरी प्रतिपाद्य असला, तरी प्रत्येक अध्यायांत जो विषय मुख्यत्वेंकरून वर्णिलेला असतेो तो या कर्मयोगशास्राचा भाग समजून दरएक अध्यायास त्यांतील विषयाप्रमाणे अमुक योग, तमुक योग, अशा निरनिराळी नांवें दिलेलाँ आहत; आणि हे सर्व योग एकत्र झाले म्हणजे “व्रह्मविद्येतील कर्मयोगशास्त्र” होते. पहिल्या अध्यायांतील या कथेचे महत्त्व काय हें आम्हं या ग्रंथाचे आरंभी सांगितले आहे. कारण, आपल्यापुढे प्रश्न काय हेंच जर प्रथम नीट कळले नाही तर त्या प्रश्नाचे उत्तरहि पुरं लक्षांत भरत नाहीं. सांसारिक कर्मापासून निवृत होऊन भगवद्भजन लाग किवा संन्यास घे, हेच जर गीतेचे तात्पर्य म्हणावयाचे, तर अर्जुन लढाईचे घोर कर्म सोडून भिक्षा मागण्यास आयताच तयार झाला असल्यामुळे त्याला हा उपदेश करण्याची जरूर नव्हती. पहिल्याच अध्यायाध अखेरीस “वाः ! काय उत्तम गोष्ट वेोललास ! तुला झालली उपरति पाहून मला आनंद वाटतों ! चल; आपण दोघेहि हा कर्ममय संसार सोडून संन्यासाश्रमानें किवा भक्तीने आपल्या आत्म्याचे कल्याण करून घेऊं!” अशा अर्थाचा एखाददुसरा लोक श्रीकृष्णाचे तोंडांत घालून तेथेच गीतेची समाप्ति करावयास पाहिजे होती. मग इकडे लढाई होऊन व्यासांनंf तिचे वर्णन करण्यांत तीन वर्ष (मभा. आ. ६२.५२) आपल्या वाणीचा दुरुपयोग केला असता, तर निदान अर्जुन आणि श्रीकृष्ण यांस तरी त्याचा दोष लागला नसता. कुरुक्षेत्रावर जमलल्या शेकडों महारथ्यांनाँ अर्जुनाचा व श्रीकृष्णाचा उपहास केला असता खरा, पण ज्याला आपल्या आत्म्याचे कल्याण करावयाचे तो असल्या उपहासास थोडीच भीक घालणार ! जग कांहीं म्हणो; “यदहरेव विरजेत् तदहरेव प्रव्रजेत्” (जा.४)--ज्या क्षणी उपरात होईलत्या क्षणी संन्यास घ्यावा, विलंब लावूनये,असें उपनिषदांतहि सांगितले आह. अर्जुनाची उपरति ज्ञानपूर्वक नसून मोहाची होती असें म्हटलें तरी उपरति झाली एवढयानेंच निम्में काम होत असल्यामुळे, मोह काढून टाकून तीच उपरति पूर्ण ज्ञानमूलक करणे भगवंतांस कांहीं अशक्य नव्हतें. कोणत्याहि कारणानें संसाराची वाट आल्यावर त्या वैतागानेंच प्रथम संसार सोडून पुढे पूर्ण सिद्धि प्राप्त करून घेतल्याची भक्तिमागीत किंवा संन्यासमार्गातहेि