पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसँह्वार Y"、"A संन्यासधर्म निषिद्ध आहे असें आमच्या धर्मशास्रकारांनीं साफ म्हटले आहे; आणि “आचारप्रभवो धर्मः” (मभा. अनु.१४९,१३७;मनु.१.१०८)या वचनाप्रमाणें धर्मशास्र हें प्रायः ज्या अर्थी आचाराचेच अनुवादक असतें, त्या अर्थी धर्मशास्रकारानीं हा निषेध घालून देण्यापूर्वीच लोकाचारांत संन्यासधर्मास गौणत्व आलेले असले पाहिजे, असें सहज सिद्ध होतें. पण कर्मयेोगाचे याप्रमाणे प्रथम प्राबल्य असून अखेर कलियुगांत संन्यासधर्म निषिद्ध मानण्यापर्यंत जर मजल येऊन ठेपली होती, तर एकदां जारीनं सुरू असलेल्या या ज्ञानयुक्त कर्मयोगास उतरती कळा लागून सध्यांच्या भक्तिमार्गातहि संन्यासपक्षचकाय तो एकटा श्रेष्ठ हें मत कसें शिरलें असा प्रश्न या ठिकाणीं साहाजेकरीत्याच उत्पन्न होतो. कित्येकांचे असें म्हणणें आहे कीं, श्रीमदाद्यशंकराचार्यानी हा फरक केला. परंतु इतिहासाकडे लक्ष दिल्यास ही उपपात बरोबर नाहीं असें दिसून येईल.श्रीशंकराचार्याच्या संप्रदायाचे (१) मायावादात्मक अद्वैत ज्ञान आणि (२)कर्म-संन्यासधर्म असे दोन विभाग होतांत हें आम्ही पहिल्याच प्रकरणात सांगितले आहे. पैकीं अद्वैतब्रह्मज्ञानाबरोबरच सन्यासधर्माचेहि उपनिषदांतून जरी प्रतिपादन केलेले असले तरी दोहोंमधला हा संबंध नित्य नसल्यामुळे अद्वैतवेदान्तमत पत्करिलें म्हणजे संन्यासमार्गहिपत्करलाच पाहिजे असें होत नाहीं. उदाहरणार्थ, याज्ञवल्क्यादिकांपासून अद्वैतवेदान्त पूर्णपणें शिकलेले जनकादिक स्वतः कर्मयोगी होते इतकेंच नव्हे, तर उपनिषदांतील अद्वैतब्रह्मज्ञानच गीतेंत जरी प्रतिपाद्य आहे तरी या ज्ञानाच्या आधारेंच संन्यासाऐवजीं कर्मयोगाचे गीतेंत समर्थन केले आहे. म्हणून संन्यासधर्मास उत्तेजन दिल्याबद्दलचा शांकरसंप्रदायावर जो आक्षेप आहे तो त्या संप्रदायांतील अद्वैतज्ञानास लागूं न पडतां तदंतर्गत संन्यासधर्मासच फक्त लागूं पडण्याचा संभव आहे, हें प्रथम लक्षांत ठेविले पाहिजे. हा संन्यासमार्ग आचार्यानीं जरी नवा काढिला नाहीं, तरी कलिवज्र्यात पडल्यामुळे त्यास जें गौणत्व आले होतें तें आचार्यानीं दूर केलें, हें खरें आहे. पण तत्पूर्वी दुसच्या कांहीं कारणांनी संन्यासमागाची आवड लोकांत जर उत्पन्न झालेली नसती तर आचार्याचे संन्यासपर मत इतकें प्रसृत झाले असतें कीं नाहीं याचा वानवाच आहे. एका गालफडांत मारली तर दुसरा गाल पुढे करावा (ल्यूक. ६.२९) म्हणून ख्रिस्तानें म्हटलें आहे. पण या मताचे अनुयायी युरोपांतील ख्रिस्ती राष्ट्रांत कितीसे आहेत याचा विचार केला, तर एखाद्या धर्मोपदेशकानें एखादी गोष्ट बरी म्हटली म्हणजे तेवढ्याचमुळे ती प्रचारांत येत नसून लोकांचीं मनें तिकडे वळण्यास तत्पूर्वी कांहीं तरी सबळ कारणे घडत असतात, आणि मग लोकाचारांत हळूहळू फेर पडून तदनुरूप

  • मागे पृष्ठ ३४० वरील टीपेंत दिलेलीं वचनें पहा.