पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

xళిx गीतारहस्य अथवा कर्मयोग तील कर्म करण्यास सांगणारा गीतेंतील निष्काम कर्मयोग त्यांच्या शास्रांत आढकून येत नाहीं. सर्वच कर्ममार्गी खरे; पण पाश्चिमात्य कर्मयोगी सुखेच्छु अथवा दुःखनिवारणच्छु,-कांहीं म्हटले तरी इच्छु अर्थात् सकाम, आणि गीतेंतील कर्मयोगी नेहमींच फलाबद्दल निष्काम असतो,-किंवा हाच अर्थ दुस-या शब्दांनीं व्यक्त केला तर गीतेंतील कर्मयोग सात्त्विक आणि पाश्चिमात्य कर्मयोग राजस-- असा या दोहोंमध्येंहि शुद्ध नीतिदृष्टयाहि फरक आहे असे दिसून येईल (गीता १८.२३.२४ पहा). केवळ कर्तव्य म्हणून परमेश्वरापणबुद्धीनें सर्व सांसारिक कर्म करीत राहून तद्द्वारा परमेश्वराचे यज़न किंवा उपासना आमरणान्तचालूठेवण्याचा जो हा गीतेंतालेज्ञानयुक्त प्रवृत्तिमार्ग किंवा कूर्मयोग यासच ‘भागवतधर्म' असें म्हूणतात. “स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्ध लभते नरः” (गी. १८. ४५) हें या मार्गातील रहस्य होय. वनपर्वांत ब्राह्मण-व्याध-कथेत (वन. २०८) व शांतिपर्वांत तुलाधार-जाजलेिसंवादांत(शां. २६१) याच धर्माचे निरूपण महाभारतांत केलेले असून मनुस्मृतीतहि यतिधर्माच्या निरूपणानंतर वेदसंन्यासिकांचा कर्मयोग म्हणून हाचे मार्ग विहित व मोक्षप्रद होय असें सांगितले आहे (मनु. ६. ९६, ९७). वेदसंन्यासिक या पदावरून व वेदाच्या संहितंतून व ब्राह्मणग्रंथांतून जीं वर्णनें अहेत त्यांवरून हृा मार्ग आमच्या देशांत अनादिकालापासून चालत आला आहे असें सिद्ध होतें. किंबहुना एरवीं हादेश कधीच वैभवशाली झाला नसता. कारण, कोणत्याहि देशांत झालें तरी कर्त पुरुष म्हटले म्हणजे ते कर्मकर्माचेच पुरस्कर्ते असले पाहिजेत हें उघड आहे. परंतु कर्त झाले तरी ब्रह्मज्ञान न सोडितां त्याला जोडूनच कर्तृत्व कायम ठेवणें हें आमच्या कर्मयोगाचे मुख्यतत्त्व आहे; आणिया बीजभूततत्त्वाचे व्यवस्थित विवेचन करून या मार्गाचे भगवंतांनीं अधिक पुष्टीकरण व प्रसार केल्यामुळे या प्राचीन मार्गासच ‘भागवतधर्म' हें नांव पुढे प्राप्त झाले असावें, असें पूर्वी सांगितले आहे. उलटपक्षीं केव्हांहि झालें तरी कांहीं थोडया ज्ञानी पुरुषांचा कल प्रथमपासूनच स्वभावतः संन्यासमागीकडे वळत असे; किंवा निदानपक्षीं प्रथम गृहस्थाश्रम करून अखेर मरणसमयीं तरी संन्यास घेण्याची बुद्धि मनांत जागृत होई-मग पुढे खरोखरीच ते संन्यास घेवोत वा न घेवोत-असें उपनिषदांवरून व्यक्त होतें. म्हणून संन्यासमार्गहिनवा म्हणता येत नाहीं. परंतु स्वभाववैचित्र्यादिकारणामुळे हे दोन्ही मार्ग आमच्याकडे याप्रमाणे प्राचीन कालापासून जरी चालत आलेले आहेत, तरी वैदिककालीं मीमांसकांच्या कर्ममार्गाचेच लोकांत विशेष प्राबल्य होतें, व कौरवपांडवांच्या कालीं तर कर्मयेगूनें संन्यासमार्गास बहुतक मार्गे टाकिलें होतें याबद्दल कांहीं शंका नाहीं. कारण, कौरवपांडवांच्या कालानंतर म्हणजे *लियुगति